नवी दिल्ली : कमी किंमतीत जास्त फायदे देणारे प्लान्स आणण्याचा टेलिकॉम कंपन्यांचा प्रयत्न असतो. आणि कडे ४०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लान्स आहेत. या दोन्ही प्लान्समध्ये दररोज ३ जीबी डेटा आणि २८ दिवसांची वैधता मिळते. मात्र, दोन्ही प्लान्समध्ये ४९ रुपयांचा फरक आहे. वाचा: जिओचा ३४९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवस असून, यात दररोज ३ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंगसह दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. म्हणजेच, जिओच्या प्लानमध्ये एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. सोबतच, ग्राहकांना Cinema, Jio Tv सारख्या अॅप्सचा मोफत अॅक्सेस देखील मिळतो. एअरटेलचा ३९८ रुपयांचा प्लान एअरटेलच्या या प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना दररोज ३ जीबी डेटा मिळतो. २८ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. या व्यतिरिक्त एअरटेलच्या प्लानमध्ये ग्राहकांना ३० दिवसांसाठी Amazon Prime Video मोबाइल एडिशन फ्री ट्रायल, ३ महिन्यांसाठी Apollo 24/7 Circle, Shaw Academy चे फ्री ऑनलाइन कोर्स, FasTag वर १०० रुपये कॅशबॅक, फ्री हेलोट्यून आणि विंक म्यूझिकचा फायदा मिळतो. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3D6WVWk