नवी दिल्ली : लवकरच भारतात आपला नवीन मिड रेंज स्मार्टफोन ला लाँच करणार आहे. या फोनला जागतिक बाजारात आधीच लाँच केले असून, याची किंमत २०० EUR (जवळपास १६,७०० रुपये) आहे. फोनमध्ये एमोलेड डिस्प्ले, ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, अँड्राइड ११ ओएस आणि ५००० एमएएचची बॅटरी सारखे फीचर्स मिळतात. वाचा: स्मार्टफोनच्या भारतातील लाँचिंग तारखेबाबत कंपनीने अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. मात्र, रिपोर्टनुसार, फोन नोव्हेंबरच्या अखेरीस अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच होऊ शकतो. भारतात Moto G31 ची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. Moto G31 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स मोटो जी३१ स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच एमोलेड डिस्प्ले मिलेल, ज्याची पिक्सल डेनसिटी ४११ 411ppi आहे. सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल डिझाइन दिले आहे. डिव्हाइसमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी८५ प्रोसेसरसह ४ जीबी रॅम आणि ६४/१२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. हा फोन अँड्राइड ११ ओएसवर काम करतो. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. रियरला ४८ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सल दुसरा सेंसर आणि २ मेगापिक्सल सेंसर मिळेल. सेल्फीसाठी यात १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. पॉवरसाठी १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळेल. बॅक पॅनेलवर मोटोरोलाच्या लोगोसह एक कॅपेसिटिव्ह फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाईल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oRyAxU