Full Width(True/False)

Nokia Tablet: नोकियाच्या टॅबलेटने घातला धुमाकूळ, दोन दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप, फीचर्स जबरदस्त

नवी दिल्लीः HMD Global ने गेल्या महिन्यात वेगवेगळ्या बाजारात आपला नोकिया टी २० टॅबलेट लाँच केला आहे. काही आठवड्यात फिनिश कंपनीने आता त्यात एका नवीन व्हर्जनची घोषणा केली आहे. याला नोकिया टी २० एज्युकेशन एडिशन (Nokia T20 Education Edition) म्हटले आहे. पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबर पासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीने फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे. परंतु, आतापर्यंत (Nokia T20 Education Edition Price In India) चा खुलासा करण्यात आला नाही. जाणून घ्या फीचर्स. Nokia T20 Education Edition चे स्पेसिफिकेशन्स नावावरूनच संकेत मिळतात की, प्रोडक्टचा उद्देश विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आहे. यात 1200 x 2000 पिक्सल स्क्रीन रिज़ॉल्यूशन सोबत १०.४ इंचाचा २ के डिस्प्ले आणि स्विच एसजीएस लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन दिले आहे. Nokia T20 Education Edition चे स्टोरेज डिव्हाइस यूनिसोक T610 प्रोसेसर द्वारा संचालित होतो. जो एक ऑक्टा कोर आहे. ज्यात 1.8GHz वर क्लॉक करण्यासाठी दोन Cortex-A75 कोर आणि 1.8GHz वर क्लॉक करण्यात आलेले सह Cortex-A55 कोर चा समावेश आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिले आहे. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट दिले आहे. Nokia T20 Education Edition चे फीचर्स नोकिया टी २० एजुकेशन एडिशन प्राथमिक, मध्ये आणि उच्च विद्यालयासाठी एकत्र नवीन शिक्षण देतो. तेही कोणतेही अतिरिक्त अॅप डाउनलोड करण्याशिवाय, यात टिचिंग सप्लिमेंट कंटेटला वेळोवेळी अपडेट केले जाणार आहे. Nokia T20 Education Edition वर पेरेंटिंग कंट्रोल असणार आहे. ही एक अशी सुविधा आहे. ज्यात आई-वडील व्हीचॅटवरून कोणत्याही वेळी टॅबलेटच्या वापराची तपासणी करू शकतात. तसेच सॉफ्टवेयर बंद करणे, अनइन्स्टॉल करणे आदीवर वॉच ठेवू शकतात. तसेच यात गेम डाउनलोड करता येत नाही. यात 8,200mAh ची बॅटरी दिली आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oPWSbv