नवी दिल्ली : चे रेंडर्स लीक झाले असून, या रेंडर्समध्ये फोनच्या डिझाइनची माहिती मिळते. याआधी देखील अनेक रिपोर्ट लीक झाले असून, यात डिव्हाइस १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणार असल्याचा दावा केला आहे. हा फोन पुढील वर्षी लाँच होऊ शकतो. मात्र, कंपनीने या फोनच्या लाँचिंगबाबत अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. वाचा: रिपोर्टनुसार, अपकमिंग Galaxy A73 स्मार्टफोनचे डिझाइन Galaxy A72 सारखे आहे. यात बॅक पॅनेलमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि उजव्या बाजूला वॉल्यूम पॉवर बटन दिले आहे. खालील बाजूला सिम ट्रे आणि यूएसबी टाइप सी पोर्ट मिळते. याआधी सप्टेंबरमध्ये समोर आलेल्या रिपोर्टनुसार, हा फोन १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येईल. यात पॉवरफुल बॅटरी आणि एचडी स्क्रीन मिळू शकते. गॅलेक्सी ए७३ स्मार्टफोन Snapdragon ७५०G चिपसेटसग येऊ शकतो. फोन अँड्राइड १२ आउट ऑफ द बॉक्सवर काम करेल. तसेच, यात ५जी कनेक्टिव्हिटी मिळेल. Galaxy A73 ची संभाव्य किंमत सॅमसंग गॅलेक्सी ए७३ स्मार्टफोनला २०२२ च्या सुरुवातीला लाँच केले जाऊ शकते व फोनची किंमत २५ ते ३० हजार रुपये असू शकते. सध्या कंपनीने फोनच्या किंमतीबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान, ला यावर्षी मार्चमध्ये लाँच करण्यात आले होते. या डिव्हाइसमध्ये ६.७ इंच फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले मिळतो. याचा मुख्य सेंसर ६४ मेगापिक्सल, १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल शूटर, ५ मेगापिक्सल मॅक्रो शूटर आणि ८ मेगापिक्सल टेलिफोटो शूटर आहे. यात फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. तसचे, स्नॅपड्रॅगन ७२०जी चिपसेट आणि ५००० एमएएचची बॅटरी मिळेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qQVqIl