नवी दिल्लीः HMD Global ने नोकिया X सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने या ५ जी फोनला सध्या अमेरिकेत लाँच केले आहे. याची किंमत २५२ डॉलर म्हणजेच जवळपास १८ हजार ६०० रुपये आहे. अमेरिकेत या फोनचा सेल १९ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. कंपनीचा हा फोन फुल एचडी प्लस डिस्प्ले, ५जी प्रोसेसर आणि ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सारखे जबरदस्त फीचर्स दिले आहेत. जाणून घ्या डिटेल्स. नोकिया X100 5G चे फीचर आणि स्पेसिफिकेशन फोनमध्ये कंपनी 1080x2400 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले ऑफर करीत आहे. हा डिस्प्ले २०.९ च्या आस्पेक्ट रेशियो सोबत येतो. नोकियाचा हा लेटेस्ट स्मार्टफोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबीच्या इंटरनेट स्टोरेज सोबत येतो. फोनची मेमरी आवश्यकतेनुसार, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येवू शकते. प्रोसेसर म्हणून कंपनीने या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४८० ५जी चिपसेट ऑफर करीत आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. नोकियाचा हा ५ जी फोनमध्ये पॉवर साठी 4470mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wF4cKE