आज स्मार्टफोन आपल्या प्रत्येक कामासाठी महत्त्वाचे डिव्हाइस झाले आहे. गेल्या काही वर्षात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसू लागले असून, ग्राहकांची मागणी पाहता कंपन्या देखील एकापेक्षा एक शानदार फोन्स बाजारात आणत आहेत. ग्राहकांचा कल कमी किंमतीत जास्त फीचर्स देणारे फोन खरेदी करण्याकडे असतो. त्यामुळे कंपन्या देखील बजेटमधील फोन्स सादर करत आहेत. तुमचे बजेट देखील १० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास काळजी करण्याचे कारण नाही. या बजेटमध्ये तुम्हाला अनेक चांगले फोन्स मिळतील. १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही Realme Narzo 30A, Motorola Moto E7 Plus, Realme C25, Micromax In 2b आणि Jio Phone Next सारखे शानदार स्मार्टफोन्स खरेदी करू शकता. कमी किंमतीत येणारे हे स्मार्टफोन्स दैनंदिन कामे करण्यासाठी उपयोगी ठरतील. या फोन्सच्या किंमती आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

realme Narzo 30A
Realme Narzo 30A या शानदार स्मार्टफोनची सुरुवाती किंमत ८,९९९ रुपये आहे. १० हजार रुपयांपर्यंतच्या किंमतीत येणारा हा शानदार स्मार्टफोन आहे. या फोनच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये ६.५ इंच डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तर रियरला १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळते. पॉवरसाठी फोनमध्ये ६००० एमएएचची बॅटरी दिली आहे.
Motorola Moto E7 Plus
Moto E7 Plus चा हा फोन १० हजार रुपयांच्या रेंजमधील सर्वोत्तम फोन आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये ६.५ इंच डिस्प्ले दिला आहे. फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४६० एसओसी प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे, तर रियरला ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिले आहे. या फोनची सुरुवाती किंमत ८,९९९ रुपये आहे.
realme C25
रियलमी सी२५ स्मार्टफोनची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनमध्ये ६.५ इंच डिस्प्ले दिला असून, रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. यात फ्रंटला सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर रियरला १३ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. पॉवरसाठी यात ६००० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळते. Realme C25 ची सुरुवाती किंमत ९,९९९ रुपये आहे.
Micromax IN 2B
१० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या Micromax In 2b मध्ये शानदार फीचर दिले आहे. Micromax च्या या स्मार्टफोनमध्ये ६.२५ इंच डिस्प्ले दिला आहे. यात रियरला १३ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सल ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोन यूनिसोक टी६१० प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये देखील ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिले आहे. यात पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनची किंमत ८,५४९ रुपये आहे.
JioPhone Next
जिओचा बहुचर्चित स्मार्टफोन JioPhone Next काही दिवसांपूर्वीच लाँच झाला आहे. यामध्ये ५.४५ इंच एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१४४० पिक्सल आहे. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास अँटी फिंगरप्रिंट कोटिंग दिली आहे. यात रियरला १३ मेगापिक्सल आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ४जी, ड्यूल सिम, ब्लूटूथ ४.१, मायक्रो-यूएसबी पोर्ट, ३.५ एमएम ऑडिओ जॅक आणि वाय-फाय मिळतो. या फोनची किंमत ६,४९९ रुपये आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wv6U5n