Full Width(True/False)

OnePlus Nord 2 स्मार्टफोनचा जिन्स पँटमध्ये स्फोट, धुळ्यातील तरुण झाला गंभीर जखमी

धुळेः वनप्लसचा पॉप्यूलर स्मार्टफोन Nord 2 मध्ये ब्लास्ट झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गिजमोचाइनाच्या रिपोर्टनुसार, फोनमध्ये ब्लास्टची ही घटना धुळ्यात घडली आहे. प्लास्ट झाला त्यावेळी फोन युजरच्या जिन्सच्या पॉकेटात होता. फोनमध्ये झालेल्या ब्लास्टचे काही फोटो सुहित शर्मा नावाच्या एका ट्विटर यूजरने शेयर केली आहेत. शेयर करण्यात आलेले फोटो पाहून या स्फोटाचा अंदाज लावला जावू शकतो की, स्फोटो किती भयानक होता. फोनच्या खालच्या बाजुला लागली आग ट्विटर यूजरने फोनच्या बॅकचेही काही फोटो शेयर केले आहेत. फोटो पाहून म्हटले जावू शकते की, फोनमध्ये खालच्या बाजुला आग लागणे सुरू झाले होते. स्फोटावेळी फोन ट्रान्सपॅरेंट टीपीयू केस मध्ये होता. तसेच याला पाहून असे वाटत होते की, ब्लास्ट नंतर हे दोन भागात फुटला होता. स्फोटात युजर गंभीर जखमी या दुर्घटनेत युजरच्या मांडीला गंभीर जखम झाली आहे. यात सुदैव म्हणजेच युजरचा जीव वाचला आहे. वनप्लस नॉर्ड २ मध्ये ब्लास्ट संबंधी कंपनीने अजून अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही. कंपनीने सुरू केला तपास कंपनीने म्हटले की, आम्ही अशा घटनेला गंभीर पणे घेतले आहे. आमची टीम युजरच्या संपर्कात आहे. आम्ही याचा तपास करण्यासाठी आवश्यक ती कारवाई पूर्ण करीत आहोत. फोनमध्ये ब्लास्ट कशामुळे झाला, याची कोणतीही माहिती कंपनीकडून अद्याप देण्यात आली नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30bap56