नवी दिल्लीः मध्ये अचानक झालेल्या स्फोटात एक यूजर गंभीर जखमी झाला होता. या दुर्घटनेची माहिती गेल्या आठवड्यात एका यूजरने दिली होती. त्याचा कंपनीकडून दुजोरा मिळाला आहे. आता एका ताज्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, वनप्लस कंपनीने रिफंड जारी केला आहे. तसेच पीडितेचा मेडिकल खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. ही घटना पहिली नाही की, OnePlus Nord 2 5G मध्ये स्फोट झाला आहे. याआधीही यासारख्या घटना उघडकीस आल्या आहेत. परंतु, लेटेस्ट दुर्घटनेत यूजर गंभीर जखमी झाला आहे. पीडितेचा हवाला देताना, MySmartPriceच्या रिपोर्ट समोर आला आहे. वनप्लसने विस्फोटसाठी रिफंड जारी केला आहे. यूजर्सच्या उपचाराचा खर्च करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. कंपनीचे ऑपरेशनल हेड सुद्धा मदतीसाठी पीडित व्यक्तीच्या संपर्कात आहे. वनप्लस ने अजून पर्यंत कोणत्याही गोष्टीला दुजोरा दिला नाही. ट्विटरवर या घटनेची माहिती देणाऱ्या यूजर्सने सुद्धा नुकसान भरपाई संबंधी कोणतेही अपडेट अद्याप दिलेले नाहीत. परंतु, त्याआधी त्या व्यक्तीने म्हटले होत की, कंपनी लागोपाठ त्याच्या संपर्कात आहे. OnePlus Nord 2 5G ला भारत आणि ग्लोल मार्केटमध्ये जुलै मध्ये लाँच केले होते. लाँच केल्यानंतर काही आठवड्यानंतर एका यूजरने आरोप केला होता की, फोन खरेदी केल्यानंतर काही दिवसांनंतर स्फोट झाला होता. यानंतर अन्य एका OnePlus Nord 2 5G यूजर ने आरोप केला होता की, त्याच्या वकीलाच्या गाउनमध्ये स्फोट झाला होता. त्या यूजरकर्त्याला एक कायदेशीर नोटीस पाठवली होती. तसेच दावा केला होता की, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासाठी “malicious and mala fide intent” केला होता. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3km66eb