नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी पैसे काढण्यासाठी व पाठवण्यासाठी बँकेत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, आता स्मार्टफोनमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्यामुळे सहज घरबसल्या मोबाइलद्वारे पैसे पाठवू शकता. मात्र, स्मार्टफोनमुळे पैसे पाठवणे जेवढे सोपे झाले आहे, तेवढेच धोकादायक आहे. वाचा: ऑनलाइन पैसे पाठवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण, एका चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. ऑनलाइन पैसे ट्रांसफर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, त्याबाबत जाणून घेऊया. बँक डिटेल पैसे पाठवताना आपण , आणि आरटीजीएसचा वापर करत असतो. अशावेळी बँकेची माहिती अचूक भरणे गरजेचे आहे. बँकेची माहिती भरल्यानंतर ती पुन्हा पुन्हा तपासावी, अन्यथा एका छोट्या चुकीमुळे पैसे इतरांच्या खात्यात जाऊ शकतात व नुकसान होईल. अकाउंट नंबर तपासा अनेकदा लोक अकाउंट नंबर टाकताना चुका करतात. अकाउंटचा एक नंबर देखील चुकल्यास पैसे दुसऱ्याच खात्यात ट्रांसफर होतात. अशा स्थितीत तुम्हाला वारंवार बँकेच्या चक्करा माराव्या लागू शकतील. आयएफएससी कोड प्रत्येक बँकेच्या ब्रँचचा एक आयएफएससी कोड असतो. ऑनलाइन पैसे ट्रांसफर करताना या कोडची गरज भासते. त्यामुळे ऑनलाइन पैसे पाठवताना योग्य आयएफएससी कोड आणि अकाउंट नंबर टाकणे अत्यंत गरजेचे आहे. मोबाइल नंबर स्मार्टफोनवर अनेक अॅप्स उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुम्ही पैसे ट्रांसफर करू शकता. मोबाइल नंबरचा वापर करून देखील पैसे पाठवता येतात. त्यामुळे चुकीचा मोबाइल नंबर टाकल्यास दुसऱ्याच व्यक्तीपर्यंत पैसे पोहचतील. त्यामुळे माहिती भरताना दोन-तीन वेळा नक्की तपासा. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30rO0kk