Full Width(True/False)

सॅमसंगने जारी केला Android 12 अपडेट, आजपासून या स्मार्टफोन्सला मिळणार

नवी दिल्लीः साउथ कोरियाची टेक दिग्गज सॅमसंगने आपल्या नवीन मोबाइल ओएस व्हर्जनला जारी केले आहे. कंपनीने OneUI 4 संबंधी आपल्या अधिकृत ब्लॉगमध्ये हे सांगितले आहे. Samsung One UI 4 ला प्लॅटफॉर्मवर बनवले आहे. तुम्हाला सर्वांना हे माहिती आहे की, अँड्रॉयड १२ गुगलचे लेटेस्ट व्हर्जनचे मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम आहे. सॅमसंगच्या माहितीनुसार, One UI 4 ला सर्वात आधी Galaxy S21 सीरीज मध्ये दिले जाणार आहे. यात Galaxy S21, Galaxy S21+ आणि Galaxy S21 Ultra चा समावेश आहे. या स्मार्टफोन्स मध्ये आजपासून One UI 4 डाउनलोड करता येवू शकते. आगामी काळात कोणकोणत्या स्मार्टफोन्समध्ये दिले जाणार आहे याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. परंतु, त्याआधी हे जाणून घ्या की, सॅमसंगच्या या नवीन व्हर्जन मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम मध्ये काय खास आहे. सॅमसंगने One UI 4 मध्ये कस्टमाइजेशन ऑप्शन्स, प्रायव्हसी फीचर्स आणि सॅमसंगचे इको सिस्टमचे अॅक्सेस यूजर्संना एक वेगळा अनुभव देणार आहे. यात तुम्हाला नवीन कलर पेलेट्स मिळतील. मेन्यू, बटन, स्क्रीन आयकॉन पासून कस्टमायजेशन फीचर्सला आणखी चांगले करण्यात आले आहे. विजेट्सआधीच्या तुलनेत जास्त कस्टमायजेशन फीचर्स दिले आहेत. प्रायव्हसी फ्रंट वर कंपनीने म्हटले की, मजबूत सिक्योरिटीची प्रायव्हसी होवू शकत नाही. यामुळे One UI 4 मध्ये सॅमसंग लेटेस्ट प्रायव्हसी सिक्योरिटी फीचर्स आणले आहे. कोणताही अॅप तुमच्यासाठी कॅमेरा किंवा मायक्रोफोन अॅक्सेस करीत आहे. तुर तुम्हाला नवीन प्रायव्हसी डॅशबोर्ड मध्ये सर्वकाही दिसेल. प्रायव्हसी सेटिंग्सला सिंपल करण्यात आले आहे. याला कंट्रोल आणि मॉनिटर सहज केले जावू शकते. One UI 4 द्वारे कंपनी आपल्या इको सिस्टमवर फोकस करीत आहे. कंपनीने म्हटले की, गुगल सारखी कंपनी सोबत पार्टनरशीप केली आहे. सॅमसंगने म्हटले की, One UI 4 चे अपडेट या स्मार्टफोन्समध्ये दिले जाणार आहे. जाणून घ्या संपूर्ण यादी. Galaxy S20, S20+, S20 Ultra, S20 FE, Note20, Note20 Ultra, S10, S10e, S10+, S10 5G, Note10, Note 10+, Galaxy Fold, Z Fold3, Z Flip3, Z Fold2, Z Flip, Z Flip 5G, Galaxy A82 5G, A72, A52, A52 5G, A52s 5G, A42 5G, and Galaxy Tab S7 आणि Tab S7+ या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cjet5E