फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, स्नॅपडीलसह सध्या अनेक ई-कॉमर्स वेबसाइट्स खरेदीसाठी उपलब्ध आहे. कपड्यांच्या शॉपिंगपासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत अनेक वेगवेगळ्या ई-कॉमर्स वेबसाइट्स आहे. विशेष म्हणजे दरवर्षी या साइट्सवरुन कोट्यावधी रुपयांची खरेदी होते. फेस्टिव्ह सीझनच्या काळात तर ही खरेदी दुप्पट झालेली असते. ई-कॉमर्स वेबसाइट्समुळे थेट बाजारात जाऊन वस्तू खरेदी करण्यात वेळ घालवावा लागत नाही. त्यामुळे कोणतीही वस्तू ऑनलाइन पाहून खरेदी करू शकता व ही वस्तू थेट घरपोच डिलिव्हर होते. अनेकजण स्मार्टफोन, टीव्ही, इयरबड्ससह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑनलाइन खरेदी करतात. या वस्तू ऑनलाइन खरेदी करण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे या प्रोडक्ट्सवर मिळणारे डिस्काउंट. तुम्ही ऑनलाइन एलईटी टीव्ही, गीजर, इलेक्ट्रिक चिमणी आणि एअर प्यूरिफायर्स सारखे इलेक्ट्रनिक अप्लायन्स खरेदी करू शकता. ऑनलाइन स्टोरवर या वस्तूंच्या खरेदीवर तुम्हाला बंपर डिस्काउंट मिळेल.

LED TV
तुम्ही जर नवीन एलईडी टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ई-कॉमर्स साइट्सवर अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. या टीव्हींची किंमत २० हजार रुपयांपासून ते एक लाखापर्यंत आहे. बाजारात २४ इंच साइजपासूनचे एलईडी टीव्ही उपलब्ध आहे. तुम्ही या टीव्हीला स्टोरमध्ये जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन खरेदी करू शकता. कारण ऑनलाइन तुम्हाला जास्त डिस्काउंट मिळेल. २४ इंच एलईडी टीव्हीला तुम्ही फक्त ७ हजारात देखील खरेदी करू शकता. ऑफलाइन स्टोरमध्ये एवढ्या किंमतीत टीव्ही शक्य नाही.
Geyser
गीजर देखील घरात उपयोगी येणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक अप्लायन्स पैकी एक आहे. तुम्ही जर बाजारात गीजर खरेदी करायला गेल्यास याची किंमत ८ हजार रुपये ते १५ हजार रुपयांपर्यंत आहे. ई कॉमर्स साइट्सवर हेच गीझर तुम्हाला ४ ते १० हजार रुपये किंमतीत मिळतील. ऑनलाइन खरेदी करताना तुम्हाला आकर्षक ऑफर्सचा देखील फायदा मिळेल. तसेच, तुम्हाला नवनवीन प्रकार, फीचर्स पाहायला मिळतात. वेगवेगळ्या कंपन्यांचे गीजर तुम्हाला ऑनलाइन मिळतील.
इलेक्ट्रिक चिमणी
इलेक्ट्रिक चिमणी देखील घरात असणे गरजेचे आहे. यामुळे घरातील व्हेंटिलेशन व्यवस्थित राहते. तसेच, जेवण बनवताना निघणारा धूर व इतर गोष्टींपासून सुटका होते. तुम्ही जर इलेक्ट्रिक चिमणीला ऑफलाइन खरेदी करत असला तर तुम्हाला व्हरायटी मिळणार नाही व यांची किंमत देखील अधिक असते. मात्र, ऑनलाइन खरेदी करताना तुमच्याकडे अनेक वेगवेगळे पर्याय असतील. तुम्ही तुमच्या बजेट व कंपनीनुसार इलेक्ट्रिक चिमणी खरेदी करू शकता.
एअर प्यूरिफायर्स
गेल्या काही दिवसात एअर प्यूरिफायर्सची मागणी देखील वाढली आहे. भारतातील अनेक शहरांमधील वायू प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढली आहे. या प्रदूषणामुळे अनेक आजार होऊ शकतात. अशा आजारांपासून वाचण्यासाठी तुम्ही घरात एक एअर प्यूरिफायर घेऊ शकता. ई-कॉमर्स साइट्सवर तुम्हाला अनेक चांगले एअर प्यूरिफायर्स मिळतील. ऑनलाइन पोर्टल्सवर तुम्हाला ६ हजार रुपयांच्या सुरुवाती किंमतीत एअर प्यूरिफायर्स मिळतील. तसेच ऑनलाइन खरेदी करताना बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर, डिस्काउंट ऑफरचा देखील लाभ मिळतो.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/325W7TQ