Full Width(True/False)

फक्त १० हजार रुपयात लाँच झाला Oppo चा नवीन स्मार्टफोन, मिळतात शानदार फीचर्स

नवी दिल्ली : ने A-सीरिज अंतर्गत आपला नवीन Oppo A16K ला लाँच केले आहे. मिड-रेंज व्हेरिएंटमध्ये येणारा हा फोन लेटेस्ट फीचर्ससह येतो. हा चे टोन्ड डाउन व्हर्जन आहे. फोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्ले आणि मीडियाटेक हीलियो जी३५ प्रोसेसर दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळतो. तसेच, ४२३० एमएएचची बॅटरी दिली आहे. वाचा: Oppo A16K ची किंमत आणि उपलब्धता Oppo A16K च्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी व्हेरिएंटची फिलिपाइन्समध्ये किंमत ६,९९९ PHP (जवळपास १०,३०० रुपये) आहे. स्मार्टफोन ब्लॅक आणि ब्लू रंगात येतो. सध्या फोन फिलिपाइन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध असून, भारत व इतर बाजारातील उपलब्धता व किंमतीबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही. कंपनीने सप्टेंबर महिन्यात भारतात Oppo A16 ला १३,९९० रुपयात सादर केले होते. फोनचे ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज हे एकच व्हेरिएंट येते. Oppo A16K चे स्पेसिफिकेशन्स ड्यूल सिम सपोर्टसह येणारा ए१६के अँड्राइड ११ आधारित कलरओएस ११.१ लाइट वर काम करतो. यामध्ये ६.५२ इंच एचडी+ (१,६००x७२० पिक्सल) आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. कंपनीचा दावा आहे की, हँडसेटमध्ये आय-केअर स्क्रीन आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो जी३५ प्रोसेसरसह ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. Oppo A16K मध्ये सिंगल १३ मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला आहे. Oppo A16 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात १३ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सल बोकेह सेंसर आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर आहे. Oppo A16K मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्यूल बँड वाय-फाय, ब्लूटूथ वी५, ३.५ एमएम हेडफोन जॅक, जीपीएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो. यात ५वी/२ए चार्जिंग सपोर्टसह ४,२३० एमएएचची बॅटरी दिली आहे. यामध्ये सुपर पॉवर सेव्हिंग मोड, नाइट फिल्टर्स आणि ऑप्टिमाइज्ड नाइट चार्जिंगची सुविधा मिळते. फोनचे वजन १७५ ग्रॅम आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bQ9BVA