Full Width(True/False)

येतोय जबरदस्त स्मार्टफोन! Poco M4 Pro 5G आज होणार लाँच, पाहा काय असेल यात खास

नवी दिल्ली: बहुचर्चित आज एका जागतिक कार्यक्रमात लाँच होणार आहे. माहितीनुसार, हे डिव्हाइस ड्युअल स्पीकर आणि ३३ फास्ट चार्जिंगसह ऑफर केले जाऊ शकते. लीक्सनुसार, Poco M4 Pro 5G मध्ये ९० Hz रिफ्रेश रेट आणि ड्युअल रियर कॅमेरे देखील दिले जाऊ शकतात. भारतात ते कधी लाँच होणार याची माहिती सध्या उपलब्ध नाही. वाचा: Poco M4 Pro 5G अपेक्षित किंमत: कंपनीने पोको ग्लोबलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करून माहिती दिली आहे की Poco M4 Pro 5G लाँच इव्हेंट ८ pm GMT + ८ (भारतीय वेळेनुसार ५.३० pm) सुरू होईल. हा व्हर्च्युअल कार्यक्रम YouTube आणि इतर सोशल प्लॅटफ्रॉर्मद्वारे Live Stream केला जाऊ शकतो. किमतीच्या बाबतीत सांगायचे , Poco M4 Pro 5G हे Redmi Note 11 5G सारखी असण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत त्याची किंमतही या फोनच्या जवळ असू शकते. चीनमध्‍ये Redmi Note 11 5G ची किंमत CNY १,२९९ पासून सुरू होते, म्हणजेच सुमारे १४,००० रुपये. Poco M4 Pro 5G ची संभाव्य वैशिष्ट्ये: हा फोन अल्ट्रा-फास्ट प्रोसेसरसह देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. हे ६ nm चिपवर आधारित असेल. हे ३३ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिले जाईल. तसेच, यामध्ये इंटिग्रेटेड ड्युअल स्पीकर्स असतील. Poco M4 Pro 5G मध्ये 50-मेगापिक्सलचा AI कॅमेरा दिला जाऊ शकतो. यामध्ये ६.६ इंचाचा फुल एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. आणखी एका लीकनुसार, हा फोन MediaTek Dimensity 810 प्रोसेसरने सुसज्ज असण्याची अपेक्षा आहे. हा फोन ४GB + १२८ GB, ६G B + १२८ GB आणि ८ GB + १२८ GB व्हेरिएंटमध्ये दिला जाऊ शकतो. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, बातमीनुसार, Poco M4 Pro 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. नमूद केल्याप्रमाणे, त्याचा प्राथमिक सेन्सर ५० मेगापिक्सेलचा AI कॅमेरा असू शकतो. त्याचबरोबर यामध्ये LED फ्लॅश देखील दिला जाऊ शकतो. हे पंच-होल डिस्प्लेसह ऑफर केले जाईल. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. याशिवाय ५००० mAh बॅटरी दिली जाऊ शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Yu5ATz