नवी दिल्ली : Android फोन युजर्सनी पुन्हा सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. एक नवीन स्पायवेअर सध्या युजर्सच्या डोकेदुखीचे कारण बनला असून हा स्पायवेअर वैयक्तिक डेटा चोरत असल्याची माहिती समोर आली आहे. याचा सर्वाधिक फटका सध्या दक्षिण कोरियातील अँड्रॉइड युजर्सना बसला आहे. याला फोनस्पाय असे नाव देण्यात आले आहे. वाचा: PhoneSpy 23 अॅप्समध्ये मोबाईल सिक्युरिटी फर्म झिम्पेरिअमने याबाबत माहिती दिली आहे. PhoneSpy 23 अॅप्समध्ये आढळून आले असून हे अॅप्स बनावट दिसत नाहीत. Identity चोरण्यासोबतच , ते युजर्सचे अधिक नुकसान देखील करू शकतात. संशोधकाच्या मते, फोनच्या कॅमेऱ्यात प्रवेश घेऊन फोनस्पाय युजर्सच्या नकळत रिअल-टाइम फोटो आणि व्हिडिओ काढू शकतो. हे फोटो किंवा व्हिडिओ वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट युजर्सना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. याशिवाय, याचा वापर सायबर हेरगिरीसाठीही होऊ शकतो. हे खूपच भीतीदायक आहे. जर युजर्सनी चुकून PhoneSpy प्रभावित अॅप डाउनलोड केले असेल तर त्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हे अॅप्स विविध प्रकारच्या परवानग्या मागतात. परवानगी दिल्यानंतर, PhoneSpy फोनच्या अॅप मेनूमधून स्वतःला लपवून आणि बॅकग्राउंडमध्ये युजर्सचा मागोवा घेते. संशोधकाच्या मते, हे अॅप सध्या प्ले स्टोअरवर नाही. PhoneSpy वेब-ट्रॅफिक रीडायरेक्शन किंवा सोशल इंजिनिअरिंगद्वारे स्वतःचा प्रसार करते. या स्पायवेअरचा मागोवा घेणे खूप कठीण आहे. यामुळे, युजर्सनी कोणत्याही Thrid Party कडून अॅप डाउनलोड करणे टाळावे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Cfc9Ht