Full Width(True/False)

प्रत्येक भेटीत तोच जिव्हाळा...बाबासाहेब पुरंदरे यांना कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : शिवशाहीर यांचे सोमवारी (१५ नोव्हेंबर) रोजी निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर गेल्या एक आठवड्यापासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती दिवसागणिक खालावत गेल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर सोमवारी बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. जिव्हाळा आपुलकीचा स्रोत हरपला- डॉ. राज शिवछत्रपती, संभाजी महाराज यांसारख्या अनेक ऐतिहासिक मालिकांमुळे घराघरात लोकप्रिय झालेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना सोशल मीडियावर आदरांजली वाहिली आहे. बाबासाहेबांच्या निधनाची बातमी आल्यानंतर डॉ. अमोल यांनी एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'त्येक भेट कॅमेऱ्यात टिपली गेली नसेल पण स्मृतिपटलावर नक्कीच कोरली आहे. "राजा शिवछत्रपती" मालिकेच्या सेटवर दिलेल्या आशीर्वादपर पसंतीच्या पावतीपासून ते अगदी मागील वर्षीच्या दिवाळसणापर्यंत अनेक ठिकाणी, अनेक निमित्ताने भेटी झाल्या. प्रत्येक भेटीत जाणवला तो जिव्हाळा आणि इतिहासाविषयी आत्मियता... इतिहासाच्या ध्यासाचं, त्याच्या भव्यदिव्य सादरीकरणाचं, चालत्या बोलत्या शिवशाहिरीचं एक शतक काळाच्या पडद्याआड गेलं...भावपूर्ण श्रद्धांजली' या पोस्ट सोबत डॉ. अमोल यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबतच्या फोटोंचा कोलाज शेअर केला आहे. अभिनेता याने देखील बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहिली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, ' छत्रपती शिवाजी महाराज यांच अलौकिक चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात पोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली...' या पोस्टसोबत सुबोधने बाबासाहेबांचा प्रसन्न मुद्रेतील एक फोटोही शेअर केला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री यांनी देखील बाबासाहेब पुरंदरे यांना सोशल मीडियावर आदरांजली वाहिली आहे. रोहिणी हट्टंगडी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ' बाबासाहेब, लहानपणापासून तुम्हाला बघत आले. कॉलेजात असताना, तुमची शिवाजी महाराजांवरची भक्ती, प्रेम,अभिमान तुमच्या सिंहगडावरच्या 'वेगात दौडले वीर मराठे' च्या कथनात जाणवली. एका कार्यक्रमात तुमच्या भाषणात, माझा 'आमची रोहिणी..' म्हणून केलेला उल्लेख ऐकून गलबलले होते. तुमचं संपूर्ण जीवन आमच्यासाठी आदर्श आहे.. ऋणी आहोत! मुजरा बाबासाहेब!'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3Dl1pZr