Full Width(True/False)

Photos- देहरादूनमध्ये दीपिका- रणवीर सिंगचं 'लाल इश्क'

मुंबई : आणि बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि क्युट कपल म्हणून ओळखले जातात. केवळ पडद्यावरच नाही तर व्यक्तिगत आयुष्यातही त्यांच्या दोघांची केमिस्ट्री उत्तम आहे. दीपिकाचा स्वभाव थोडासा लाजाळू तर रणवीरचा स्वभाव एकदम दिलखुलास आहे. जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो दीपिकावर खुलेपणाने प्रेम व्यक्त करत असतो. त्यांची ही जोडी चाहत्यांना देखील प्रचंड आवडत असल्याने ते देखील त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात. दीपवीरने शेअर केले रोमँटिक फोटो दीपिका आणि रणवीरने १४ आणि १५ नोव्हेंबर २०१८ मध्ये इटलीत डेस्टिनेशन वेडिंग केले होते. या दोघांनी त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस उत्तराखंडमधील देहरादून येथे साजरा केला. विशेष म्हणजे यावेळचे काही फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले. एक दोन नाही तर १० हून जास्त फोटो दीपिका आणि रणवीरने त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर केले. विशेष म्हणजे चाहतेही त्यावर भरभरून कमेन्ट करत आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये हिलस्टेशनवर जाणे सर्वांनाच आवडते. रणवीर आणि दीपिकानेही त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्तराखंडची निवड केली. दीपिकाने त्यांच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. दीपिकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दीपिकाने स्वेटर घातलेला दिसत आहे. तर आणखी एका फोटोमध्ये रणवीरसोबत डायनिंग टेबलवर बसलेली दिसत आहे. अजून एक शेअर केलेल्या फोटोमध्ये दीपिका शेकोटीजवळ बसलेली दिसते. दीपिकानेही तिच्या इन्स्टाग्रामवर देहरादूनमधील त्यांचे काही फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करताना दीपिकाने लिहिले की, 'माझं पूर्ण हृदय' या फोटोमध्ये दीपिका रणवीरला किस करताना दिसत आहे. दीपवीरने जे फोटो शेअर केले ते काही मोनोक्रोम इफेक्टमध्ये आहे तर काही रंगीत आहेत. हे फोटो त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडले असून ते भरभरून कमेन्ट करत आहेत. रणवीर दीपिकाने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो क्षणार्धात व्हायरल झाले आहेत. लग्नाच्या वाढदिवासच्या निमित्ताने या दोघांनी त्यांच्या व्यग्र अशा दिनक्रमातून एकमेकांसाठी वेळ काढला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nqjyiU