Full Width(True/False)

Vivo Y54s Launch: ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह Vivo Y54s लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली: स्मार्टफोन चीन मध्ये लाँच करण्यात आला असून हा 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 700 चिपसेट सह येतो. यात वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्ले आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. तसेच, यात १३ MP प्राथमिक सेन्सर आहे. या व्यतिरिक्त, नवीन डिव्हाइसमध्ये ५००० mAh बॅटरी आहे ज्यामध्ये १२८ GB इंटर्नल स्टोरेजसह रिव्हर्स चार्जिंग आणि जलद चार्जिंगसाठी समर्थन आहे. जाणून घेऊया Vivo Y54s ची किंमत आणि फीचर्स. वाचा: Vivo Y54s ची किंमत आणि उपलब्धता: Vivo Y54s स्मार्टफोनची किंमत १,६९९ चीनी युआन म्हणजेच सुमारे १९,८०० रुपये आहे. हा स्मार्टफोन ६ GB रॅम + १२८ GB स्टोरेज पर्यायासह येतो. हा स्मार्टफोन लेक ब्लू आणि टायटॅनियम एम्प्टी ग्रे कलर पर्यायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. भारतात हे डिव्हाईस कधी लाँच केले जाईल याबद्दल अद्याप माहीत उपलब्ध नाही. Vivo Y54s चे स्पेसिफिकेशन्स: Vivo Y54s स्मार्टफोनमध्ये ड्युअल-सिम स्लॉट आहे. हा फोन Android ११ आधारित OriginOS १.० वर काम करतो. यात ६.५१ -इंचाचा फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन १६००×७२० पिक्सेल, आस्पेक्ट रेशो २० :९ आणि स्क्रीन ते बॉडी रेशो ८९ टक्के आहे. या डिवाइसमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ ७०० प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय, फोनमध्ये ६ GB रॅम आणि १२८ GB इंटर्नल स्टोरेज मिळेल, जे मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते. Vivo Y54s कॅमेरा: Vivo Y54s स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. त्याचा मुख्य सेन्सर १३ MP आहे, तर २ MP चा डेप्थ सेन्सर आहे. याशिवाय फोनच्या पुढील भागात ८ MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल. Vivo Y54s बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी: कंपनीने Vivo Y54s स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी दिली आहे, जी १८ W फास्ट चार्जिंगने चार्ज केली जाऊ शकते. यासोबतच यामध्ये फेस अनलॉक आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय Vivo Y54S स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ३.५ mm हेडफोन जॅक, ब्लूटूथ ५.१ Wi-Fi, GPS, OTG आणि मायक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. त्याचे वजन १८८ ग्रॅम आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kNsygu