Full Width(True/False)

Port Mobile Number: मोबाईल नंबर पोर्ट करायचंय तर मिनिटांत होईल काम, पाहा स्टेप्स

नवी दिल्ली: Plan Rates वाढणार असून २६ नोव्हेंबरपासून ही वाढ होणार आहे. त्याच वेळी, Vodafone Idea बद्दल बोलायचे तर, उद्यापासून म्हणजेच २५ नोव्हेंबरपासून कंपनीच्या प्लानच्या किंमती वाढणार आहे. Airtel चे प्लान्स आधीच खूप महाग होते. तरीही अनेक युजर्स ते वापरत होते. परंतु,आता कंपनी महागड्या प्लानच्या किंमती वाढवणार आहे. अशात युजर्स कंपनी सोडून इतर दूरसंचार कंपनीकडे जाऊ शकतात. Vi सोबतही असेच काही घडू शकते. वाचा: ही केवळ एक शक्यता आहे. कारण ज्या पद्धतीने Airtel आणि Vi प्लानची किंमत वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे, त्याच प्रकारे काही यूजर्स त्यांचा टेलिकॉम प्रोव्हायडर बदलू शकतात असं दिसतंय. या प्रक्रियेला MNP म्हणजेच मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी असे म्हणतात. जर तुम्ही तुमचा टेलिकॉम प्रोव्हायडर बदलण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला संपूर्ण मार्ग सांगत आहोत. जाणून घेऊया नंबर कसा पोर्ट करायचा. नंबर पोर्ट अशा प्रकारे करा: जर तुम्हाला Airtel वरून इतर कोणत्याही नेटवर्कवर स्विच करायचे असेल तर तुम्हाला काही Steps फॉलो कराव्या लागतील:
  • प्रथम तुम्हाला नंबर पोर्ट करण्यासाठी UPC जनरेट करणे आवश्यक आहे.
  • UPC म्हणजे युनिक पोर्टिंग कोड.यासाठी तुम्हाला मेसेज करावा लागेल.
  • मेसेजमध्ये तुम्हाला PORT (Space) मोबाईल नंबर लिहायचा आहे, त्यानंतर तो १९०० नंबरवर पाठवावा लागेल.
  • मेसेज पाठवल्यावर काही वेळाने तुम्हाला एक मेसेज येईल ज्यामध्ये UPC दिले जाईल.
  • यानंतर, तुम्हाला ज्या टेलिकॉम ऑपरेटरमध्ये सामील व्हायचे आहे त्याच्या अधिकृत आउटलेटवर जावे लागेल.
  • त्यानंतर त्यांना यूपीसी कोड द्यावा लागेल आणि आयडी पुरावा द्यावा लागेल. त्यानंतर बायोमेट्रिक प्रक्रिया केली जाईल.
  • त्यानंतर तुम्हाला नवीन सिम दिले जाईल. हे सिम ७ दिवसात सक्रिय होईल.
वाचा वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CRlky6