नवी दिल्ली : आणि हुवावेने काही महिन्यांपूर्वी फोल्डेबल डिस्प्लेसह येणारे स्मार्टफोन्स लाँच केले आहे. हुवावे भारतात नसली तरी सॅमसंग फोल्डेबल डिस्प्लेसह येणारे स्मार्टफोन्स लाँच करत आहे. आता इतर कंपन्या देखील फोल्डेबल स्मार्टफोन्स आणण्याच्या तयारीत आहेत. चीनी स्मार्टफोन कंपनी ओप्पो देखील फोल्डेबल फोनवर काम करत असल्याचे समोर आले होते. वाचा: आता फोल्डेबल फोन आणण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. रियलमीच्या फोल्डेबल डिस्प्ले स्मार्टफोनची कॉन्सेप्ट ड्रॉइंग लीक झाली आहे. कंपनीच्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनला म्हटले जात आहे. रियलमीने म्हटले आहे की, कंपनी आता अल्ट्रा प्रीमियम सेगमेंटमध्ये उतरणार आहे. मात्र, कंपनीने अधिकृतपणे फोल्डेबल फोनबाबत काहीही माहिती दिलेली नाही. कथितरित्या Realme GT Fold 2 चा कव्हर डिस्प्ले फुल साइज असेल. सॅमसंगने देखील फोल्ड कव्हर डिस्प्लेला जुन्या जनरेशनच्या तुलनेत मोठे ठेवले आहे. सर्वसाधारणपणे यूजर कव्हर डिस्प्लेचा वापर करतो व जेव्हा व्हिडिओ कॉन्टेंट आणि मल्टी टास्किंग करायची असेल, तेव्हाच फोनला पूर्णपणे अनफोल्ड करून वापरले जाते. टिप्स्टर Ice Universe ने काही कॉन्सेप्ट ड्रॉइंग शेअर केल्या आहेत. यात Realme GT Fold कसा असेल याबाबत माहिती दिली आहे. लीक रिपोर्टनुसार, फोनमध्ये ६.५ इंच AMOLED कव्हर डिस्प्ले मिळू शकतो. कॉन्सेप्ट खरे असल्यास हा सर्वसाधारण स्मार्टफोनप्रमाणेच असेल. मात्र, अनफोल्ड केल्यानंतर फोल्डेबल स्मार्टप्रमाणे वाटेल. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि यूएसबी टाइप सी सपोर्ट दिला जाऊ शकतो. प्रोसेसर कोणता असेल याची माहिती समोर आलेली नाही. फोन अल्ट्रा प्रीमियम असेल, त्यामुळे फ्लॅगशिप प्रोसेसर मिळेल. कंपनीने फोल्डेबल स्मार्टफोन असल्यास याची किंमत जास्त असू शकते. कंपनीच्या फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत ५०-६० हजार रुपयांपेक्षा अधिक असू शकते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3HD0juK