नवी दिल्ली: तुम्ही जर प्रीपेड ऐवजी पोस्टपेड प्लान घेण्यास प्राधान्य देणारे युजर असाल आणि एका स्वस्त प्लानच्या शोधात असाल, तर ही विशेष माहिती तुमच्यासाठीच. मार्केटमध्ये असे अनेक Telecom ऑपरेटर आहेत जे कमी किमतीत चांगले फायदे देत आहेत. यात जिओ अव्वल स्थानावर आहे. यासोबत, इतर कंपन्या देखील चांगले प्लान्स ऑफर करत आहे. आणि चे कोणते प्लान या प्लानच्या स्पर्धेत आहेत हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या डिटेल्स. वाचा: चा सर्वात स्वस्त प्लान: Postpaid Plusप्लानची किंमत ३९९ रुपये आहे. ही रेंटलची किंमत आहे. या प्लानमध्ये एकूण ७५ जीबी डेटा दिला जात आहे. यासोबतच २०० GB डेटा रोलओव्हरची सुविधाही दिली जात आहे. त्याचबरोबर कोणत्याही नंबरवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. याशिवाय दररोज १०० मेसेजेही उपलब्ध करून दिले जात आहेत. यात युजर्सना जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. तसेच Netflix, Amazon Prime, Disney + Hotstar चे सदस्यत्व देखील उपलब्ध आहे. इतर कंपन्यांच्या प्लान्सचे डिटेल्स: Airtel चा ३९९ रुपयांचा प्लान: Airtel च्या ३९९ रुपयांच्या प्लानबद्दल बोलायचे झाले तर त्यात Airtel च्या ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये रोलओव्हर सुविधेसह ४० जीबी डेटा देण्यात आला आहे. तसेच दररोज १०० एसएमएस दिले जातात. याशिवाय कोणत्याही नंबरवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. त्याचबरोबर Amazon Prime ची एक वर्षाची मेंबरशिप दिली जात आहे. Vi चा ३९९ रुपयांचा प्लान: आता Vi च्या ३९९ रुपयांच्या प्लानबद्दल बोलूया, तर त्यात ४० जीबी डेटा दिला जाईल. त्याच वेळी, १५० GB अतिरिक्त डेटा दिला जाईल. त्याचबरोबर महिन्याला १०० मेसेज दिले जातील. यामध्ये Vi Movies आणि TV चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. त्याच वेळी, २०० GB डेटा रोलओव्हर सुविधा देखील तुम्हाला Vi च्या ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CtYCfi