नवी दिल्लीः टेक कंपनी रेडमीने आपल्या दोन पॉप्यूलर स्मार्टफोन आणि ला महाग केले आहे. दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतीत ३०० रुपयाची वाढ करण्यात आली आहे. प्राइस हाइक नंतर रेडमी ९ ए च्या २ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत आता ६ हजार ९९९ रुपयाऐवजी ७ हजार २९९ रुपये झाली आहे. तसेच ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपयांऐवजी ८ हजार २९९ रुपये झाली आहे. याच पद्धतीने रेडमी ९ए स्पोर्टच्या २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत आता ६ हजार ९९९ रुपयांऐवजी ७ हजार २९९ रुपये झाली आहे. या फोनच्या ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटच्या फोनसाठी आता ७ हजार ९९९ रुपयांऐवजी ८ हजार २९९ रुपये मोजावे लागणार आहेत. वाढलेल्या किंमती कंपनीच्या वेबसाइट आणि अमेझॉन इंडियावर अपडेट करण्यात आल्या आहेत. रेडमी 9A चे फीचर आणि स्पेसिफिकेशन फोनमध्ये कंपनीने 1600x720 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५३ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले ऑफर केले आहे. ३ जीबी पर्यंत रॅम आणि ३२ जीबीचे इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G25 SoC प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये सिंगल कॅमेरा यूनिट दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. हा फोन अँड्रॉयड 10 वर बेस्ड MIUI 11 काम करतो. रेडमी 9A स्पोर्ट चे फीचर आणि स्पेसिफिकेशन हा फोन ६.५३ इंचाच्या एचडी प्लस आयपीएस एलसीडी पॅनेलसोबत येतो. फोनमध्ये ३ जीबी पर्यंत रॅम आणि ३२ जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये तुम्हाला मीडियाटेक हीलियो जी २५ चिपसेट मिळेल. फोनच्या बॅक पॅनेलवर एलईडी फ्लॅश सोबत एक १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि एक एआय सेकंडरी शूटर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा पाहायला मिळेल. फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qw3Rss