Full Width(True/False)

YouTube ची मोठी घोषणा, व्हिडिओ खाली दिसणार नाही 'डिसलाइक'ची संख्या; ‘हे’ आहे कारण

नवी दिल्ली : ने ची संख्या दाखवणे बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे यूजर्सला कोणत्याही व्हिडिओवर डिसलाइक काउंट दिसणार नाही. युट्यूबच्या या निर्णयावर वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहे. काही हा निर्णय चांगला मानत आहेत, तर काहींच्या मते क्रिएटर्सवर याचा परिणाम होईल. मात्र, युट्यूबचे मत वेगळे आहे. वाचा: युट्यूबनुसार, डिसलाइकला प्रायव्हेट केल्याने कंपनी क्रिएटर्सला हॅरेसमेंटपासून वाचवू शकेल व ‘डिसलाइक अटॅक’ नावाच्या धोक्यापासून क्रिएटर्सचा बचाव होईल. मात्र, प्रत्येक व्हिडिओवर लाइक आणि डिसलाइकचा पर्याय उपलब्ध असणार आहे. परंतु, आधीप्रमाणे किती लोकांनी डिसलाइक केले हे दिसणार नाही. कोणत्या व्हिडिओला किती डिसलाइक आहेत, हे केवळ व्हिडिओ अपलोड करणाऱ्या कंटेंट क्रिएटरलाच दिसेल. यूजर्स व्हिडिओ न आवडल्यास डिसलाइक करू शकतात. युट्यूब क्रिएटर्स YouTube स्टुडिओद्वारे व्हिडिओ परफॉर्मेंससह डिसलाइक काउंट देखील दिसेल. कंपनीनुसार, लहान क्रिएटर्स व जे या प्लॅटफॉर्मवर सुरुवात करत आहे, त्यांना डिसलाइकद्वारे टार्गेट केले जाते व यामुळे त्यांची निराशा होते. मेंटल हेल्थचे कारण देत इतर कंपन्यांनी देखील डिसलाइक काउंट हाइड करण्यास सुरुवात केली आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुकने देखील पोस्ट रिएक्शन काउंट हाइड केला आहे. युट्यूबने याआधी जुलैमध्ये डिसलाइक काउंट बंद करून क्रिएटर्सला हॅरेसमेंटपासून वाचवता येईल का हे देखील पाहिले होते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3n82iz1