नवी दिल्ली: ने ऑक्टोबर २०२० मध्ये स्मार्ट टेलिव्हिजन श्रेणीत प्रवेश केला. कंपनीने सुरुवातीला OPPO S1 आणि OPPO Smart TV R1 हे दोन मॉडेल सादर केले. त्याच्या पदार्पणाच्या एका वर्षानंतर, नंतरच्या मॉडेलला आता या आठवड्याच्या शेवटी नवीन Variant मिळण्याचे कन्फर्म झाले आहे. OPPO २५ नोव्हेंबर रोजी चीनमध्ये OPPO Reno7 Series साठी लाँच इव्हेंट आयोजित करणार असल्याचेही समजते. वाचा: इव्हेंटमध्ये OPPO Reno7 सह स्मार्ट टीव्ही लाँच केला जाईल फर्मने खुलासा केला आहे की, कार्यक्रमात OPPO Enco Free2i TWS इयरबड्स व्यतिरिक्त, म्हणून डब केलेल्या नवीन स्मार्ट टीव्हीचे अनावरण करेल. ऑडिओ सुधारेल : नावाप्रमाणेच, ब्रँडचा आगामी टेलिव्हिजन हा आधीपासून अस्तित्वात असलेल्या मॉडेलचा एक प्रकार असेल. टीझरनुसार, OPPO Smart TV R1 ची नवीन आवृत्ती Dynaudio च्या सहकार्याने ऑडिओमध्ये सुधारणा करेल. मागील आवृत्तीत याची कमतरता होती : मागील वर्षीच्या ओरिजिनल OPPO Smart TV R1 मध्ये डायनाडिओ ट्युनिंगची कमतरता होती, तर महागड्या OPPO Smart TV S1 मध्ये ते असेल . ऑडिओ व्यतिरिक्त, नवीन प्रकार वैशिष्ट्यांच्या बाबतीत आधीच्या मॉडेल प्रमाणेच असेल. पण, नवीन मॉडेल आकारात देखील येऊ शकेल. OPPO स्मार्ट टीव्ही R1 ची वैशिष्ट्ये : OPPO स्मार्ट टीव्ही R1 मध्ये 4K LCD पॅनेल, ९३ % DCI-P3 कलर गॅमट, MEMC, MediaTek MTK9652 चिपसेट, २ GB RAM, ३२ GB स्टोरेज, 8K व्हिडिओ प्लेबॅक सपोर्ट, WiFi 6, HDMI 2.1, Oppo Share, NFC रिमोट कंट्रोल, पॉप-अप वैशिष्ट्ये आहेत. कॅमेरा, २० W स्पीकर, डॉल्बी ऑडिओ, फार फील्ड मायक्रोफोन आणि ColorOS TV ऑपरेटिंग सिस्टमचा समावेश असेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3r0qVzM