नवी दिल्ली : बहुतांश आजही शेतीसाठी जुन्या तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतात. यामुळे अनेकदा नुकसानच होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती व्हावी व त्यांच्यापर्यंत नवीन योजना पोहचाव्या यासाठी गुजरात सरकारने फोन योजना सुरु केली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी १,५०० रुपये दिले जाणार आहेत. स्मार्टफोनवर व्हिडिओ पाहून शेतकरी नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊ शकतील व शेतीतून आर्थिक फायदा होण्यास मदत मिळेल. वाचा: देशात सध्या '' मोहीम जोरात सुरू आहे. अशात डिजिटल तंत्रज्ञानाशी शेतकऱ्यांना जोडण्यासाठी त्यांना स्मार्टफोन देणार आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फोन खरेदीसाठी मदत निधी म्हणून पैसे दिले जातील. यासाठी सरकार १,५०० रुपये देईल. ही माहिती राज्याच्या कृषी विभागाने दिली आहे. शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन आल्यास ते शेतीशी संबंधित अनेक कामांसाठी त्याचा उपयोग करू शकतील. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. स्मार्टफोनच्या मदतीने शेतकऱ्यांना हवामानाची माहिती, किटकांची माहिती, शेतीशी संबंधित तंत्रज्ञान, उपकरणांचा उपयोग, तज्ञांचे मत अशी विविध माहिती मिळेल. स्मार्टफोनद्वारे शेतकरी शेतीशी संबंधित केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. तसेच, कॅमेरा, ईमेल, टेक्स्ट, जीपीएस, वेब ब्राउजर, इंटरनेटच्या माध्यमातून आतापर्यंत ज्या गोष्टी माहिती पडत नव्हत्या त्या देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहचतील. हे लोक करू शकतात अर्ज गुजरातच्या कृषी, शेतकरी कल्याण व सहाय्यक विभागाने म्हटले आहे की, गुजरातमधील कोणतीही व्यक्ती ज्याच्याकडे स्वतःची जमीन आहे, ती स्मार्टफोनच्या एकूण किंमतीच्या १० टक्के रक्कमेसाठी अर्ज करू शकते. मात्र, ही रक्कम १,५०० रुपयांपेक्षा अधिक नसावी. योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना i-khedut पोर्टलला भेट द्यावी लागेल. अर्ज स्विकारल्यानंतर शेतकऱ्यांना स्मार्टफोनचे बिल, आयएमईआय नंबर, कॅन्सल चेक व अन्य काही महत्त्वाची कागदपत्रं जमा करावी लागतील. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DZHekl