Full Width(True/False)

स्मार्टफोनच्या किमतीत सुपर वाइड डिस्प्लेसह Teclast T40 Pro Tablet लाँच, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Teclast कंपनीने चा एक नवीन टॅबलेट, Teclast T40 Pro लाँच केला आहे. विशेष बाब म्हणजे या टॅबमध्ये एक मजबूत बॅटरी आहे, ज्यामुळे युजर्स हे डिव्हाइस बराच वेळ वापरू शकतात. तसेच याला पुन्हा पुन्हा चार्ज करण्याची गरज भासणार नाही. विशेष बाब म्हणजे या टॅबचा डिस्प्ले साइज देखील खूप चांगला आहे, ज्यामुळे यूजर्सना गेम खेळण्याचा आणि व्हिडिओ पाहण्याचा उत्तम अनुभव मिळणार आहे. वाचा: याआधी, कंपनीने T40 मालिकेत Teclast T40 आणि Teclast T40 Plus टॅब्लेट बाजारात आणले आहेत. T40 Pro हे या मालिकेतील तिसरे मॉडेल आहे. या टॅबमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत. पाहा डिटेल्स. Teclast T40 Pro Tab वैशिष्ट्ये : Teclast T40 Pro Tab च्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, सर्वात आधी यूजर्सची नजर त्याच्या डिस्प्लेवर असेल जी १०.४ इंच आहे. त्यात 2K सपोर्ट देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन २००० x १२०० p आहे. या डिस्प्लेला रुंद बनवण्यात त्याचे अति-पातळ बेझल्स मोठी भूमिका बजावतात आणि यामुळे टॅब खूप चांगला आणि प्रीमियम दिसतो. टॅबलेट Android ११ वर काम करतो, यात UNISOC T618 प्रोसेसर देण्यात आला आहे. या टॅबलेटमध्ये वापरकर्त्यांना ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. या टॅबमध्ये एकच कॅमेरा मिळेल, ज्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हा कॅमेरा १६ मेगापिक्सेलचा असू शकतो. यात 4G सपोर्ट आहे. या टॅबमध्ये ड्युअल-सिम इन्स्टॉल करता येते. बॅटरी : Teclast T40 Pro मध्ये कंपनीने ७००० mAh बॅटरी दिली आहे, जी १८ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. किंमत: Teclast T40 Pro च्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, रिपोर्टनुसार, या टॅबच्या ८ GB RAM + १२८ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY १,२९९ सुमारे १५,९०१ रुपये असून त्याची विक्री १० नोव्हेंबरपासून JD.com वर सुरू होईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ktS5v3