सध्या स्मार्टफोनमध्ये एकापेक्षा एक स्मार्टफोन लाँच करण्याची स्पर्धाच सुरु आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. देशातील आणि जगातील सुप्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपन्या बाजारात एकापेक्षा एक स्मार्टफोन देत असतात. आज आम्ही तुम्हाला Infinix Note 11S, Vivo V23e, Poco M4 Pro 5G, Poco F3 Moonlight Silver, Nokia X100 5G आणि Tecno Pop 5C बद्दल सांगत आहोत जे गेल्या आठवड्यात जागतिक स्तरावर लाँच झाले. येथे आम्ही तुम्हाला या सर्व स्मार्टफोन्सच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देत आहोत.य हे सर्व स्मार्टफोन्स युजर्सच्या आवडत्या कंपनीचे असून यातील प्रत्येक हॅन्डसेटमध्ये काही भन्नाट फीचर्स देण्यात आले आहे. तुम्ही जर अनेक दिवसांपासून एक चांगला स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही लिस्ट नक्कीच पाहा आणि खरेदी करा तुमचा आवडता फोन.

Tecno pop 5C
Tecno Pop 5C मध्ये ५.०० इंचाचा TFT डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४८० प्रोसेसरवर काम करतो. फ्रंट कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले २ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर, या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ५ मेगापिक्सेलचा पहिला कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये १८ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी २४०० mAh बॅटरी आहे. हा स्मार्टफोन Android 10 (Go Edition) वर काम करतो. बातमी लिहिपर्यंत, Tecno Pop 5C च्या १ GB RAM आणि १६ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत भारतीय चलनानुसार ४,९९९ रुपये आहे.
Nokia X100 5G
Nokia X100 5G मध्ये ६.६७ इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. फ्रंट कॅमेर्याबद्दल १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर, या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ४८ मेगापिक्सेलचा पहिला कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा, २ मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आहे. २ मेगापिक्सल्सचा चौथा कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये १८ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी ४४७० mAh बॅटरी आहे. स्मार्टफोन Android 11 वर काम करतो. बातमी लिहिपर्यंत, Nokia X100 5G च्या ६ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत भारतीय चलनानुसार USD २५२ म्हणजेच १८,६०० रुपये आहे.
Poco F3 Moonlight Silver
Poco F3 मूनलाइट सिल्व्हरमध्ये ६.६७ -इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. स्मार्टफोनला ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर २० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ४८ मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा दुसरा आणि २ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ४५२० mAh बॅटरी आहे, जी ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Poco F3 Moonlight Silver च्या ८ GB RAM आणि २५६ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत भारतीय चलनानुसार 329 EUR म्हणजेच २८,९०० रुपये आहे.
Poco M4 Pro 5G
Poco M4 Pro 5G मध्ये ६.६० इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. फ्रंट कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मागील कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनच्या मागील कॅमेरामध्ये ५० मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा ८ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित Poco साठी MIUI १२.५ वर काम करतो. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, बातमी लिहिपर्यंत, Poco M4 Pro 5G च्या ६ GB RAM आणि ६४ GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत भारतीय १९,६००० रुपये आहे.
Vivo V23e
Vivo V23e मध्ये ६.४४ इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर ह्या स्मार्टफोन मध्ये Octa core MediaTek Helio G96 प्रोसेसर देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेर्याबद्दल बोलायचे ५० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या मागील कॅमेरामध्ये ६४ 64-मेगापिक्सलचा कॅमेरा८ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, बातमी लिहिपर्यंत, Vivo V23e च्या ८ GB RAM आणि १२८ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत भारतीय चलनानुसार २७,८०० रुपये आहे.
Infinix Note 11S
Infinix Note 11S मध्ये ६.७८ -इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये २ MHz ऑक्टा-कोर MediaTek Helio G88 प्रोसेसर आहे. फ्रंट कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मागील कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनच्या मागील ५० मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा, २ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि AI कॅमेरा देण्यात आला आहे.या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. बातमी लिहिपर्यंत, Infinix Note 11S च्या ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qHccK9