नवी दिल्लीः जपानची कंपनी बालमुडा ने टोकियोत आपला पहिला स्मार्टफोन लाँच केला आहे. नावाच्या या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याची साइज खूपच कॉम्पॅक्ट आहे. परंतु, यात फीचर्स मोठ मोठ्या स्मार्टफोन्सला टक्कर देतात. तसेच किंमतीत सुद्धा हा आयफोन पेक्षा कमी आहे. जाणून घ्या या फोनच्या फीचर्संसंबंधी सविस्तर. छोट्या साइजमध्ये मोठा डिस्प्ले बालमुडा फोन बाजारातील अन्य स्मार्टफोनपेक्षा थोडा वेगळा आहे. फोनमध्ये ४.९ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1080p आहे. दिसायला आयफोन एसई सारखा वाटतो. याचा डिस्प्ले ४.७ इंचाचा आहे. लाँचिंग दरम्यान कंपनीचे सीईओ यांनी म्हटले की, गेल्या काही वर्षात स्मार्टफोन्सची साइज खूप वाढली आहे. त्यामुळे बालमुडा फोन कॉम्पॅक्ट साइज आणि सर्व काही डोळ्यापुढे ठेवून डिझाइन करण्यात आले आहे. बॅक पॅनेलमध्ये साइडला थोडे स्लीम आणि मध्ये मोठा होतो. फोटोग्राफीसाठी यात सिंगल रियर आणि सिंगल फ्रंट कॅमेरा दिला आहे. मागील बाजुस ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला आहे. मागील बाजुस ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आहे. जो राइट कॉर्नरवर उपलब्ध आहे या डिझाइन सोबत लेफ्ट कॉर्नरमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. जो पंच होल कटआउट सोबत येतो. फोनची किंमत किती फोनमध्ये एक क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७६५ प्रोसेसर दिला आहे. सोबत ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. याची बॅटरी फक्त 2,500mAh दिली आहे. फोनमध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट सुद्धा मिळतो. किंमतीत जपानमध्ये या फोनला १०४८०० येन म्हणजेच जवळपास ६८ हजार रुपये किंमतीत लाँच करण्यात आले आहे. या किंमतीत भारतात नवीन अॅप्पल आयफोन १३ स्मार्टफोन खरेदी करता येवू शकतो. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nqeLyd