मुंबई: झगमगत्या सिनेसृष्टीत येणं नवख्या लोकांसाठी खूप आव्हानात्मक असतं. तिथं जितकी चांगली लोक आहेत, तितकीच वाईटही आहेत आणि त्यांचा कधी सामना होईल सांगता येत नाही. '' हे त्याचंच एक उदाहरण. हिरोइन होण्याचं स्वप्न घेऊन चमचमत्या दुनियेत दाखल होणाऱ्या बहुतेक जणींना कास्टिंग काऊचला सामोरं जावं लागतं असं नेहमी बोललं जातं.कलाकारांची निवड करताना काही निर्मात्यांकडून 'अपेक्षा'ही वेगळी ठेवली जाते. 'कॉम्प्रोमाइज' आणि 'नो कॉम्प्रोमाइज' अशी वेगळी यादीच इथं असते. ही 'कास्टिंग काउच' ची किड आता मराठी सिनेसृष्टीला पोखरत असल्याचं चित्र दिसून येत आहे. मराठी अभिनेत्रीनं नुकताच याबद्दल खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मानधनाचा मुद्दा, सेटवरील वागणूक, मानसिक छळ, कामाचे अधिक तास अशा विविध कारणांमुळे काही कलाकार मालिकेतून एक्झिट घेताना दिसले. '' या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री अन्नपूर्ण विठ्ठल यांनी टीमबद्दल धक्कादायक खुलासे करत मालिका सोडली. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही मालिका चर्चेत आली आहे. अभिनेत्री स्वाती भदवे हिनं मालिकेतील एका टीमच्या सदस्यानं तिच्यातडं शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केला आहे. तिनं प्रोडक्शन कंट्रोलर विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. स्वातीनं मालिकेतील मुख्य अभिनेत्री नंदिता पाटकरची बॉडी डबल म्हणून तिनं या मालिकेत काम केलं आहे. त्याच दरम्यान तिथं काम करत असताना प्रोडक्शन कंट्रोलर स्वप्निल लोखंडेनं मोठं काम देण्याच्या बदल्यात तिच्याकडं शरीरसुखाची मागणी केली, अशी तक्रार तिनं पोलिस ठाण्यात केली आहे. स्वप्निल लोखंडे विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार माझ्यासोबत पहिल्यांदा घडला असून सर्व धक्कादायक असल्याचं तिनं स्वातीनं म्हटलं आहे. स्वातीनं हिंदी शो क्राइम पेट्रोलमध्येही अनेक भूमिका साकरल्या आहेत. तर फुलाला सुगंध मातीचा, जिजामाता अशा मालिकांमध्येही तिनं काम केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dbbfSb