Full Width(True/False)

'ती मृतदेहाला म्हणाली- ए उठ', उत्कर्षने सांगितला भयावह अनुभव

मुंबई- '' हा छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त गाजणारा कार्यक्रम आहे. दररोज बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे नवीन चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळतात. घरातील सदस्य एकमेकांसोबत भांडताना दिसतात तर टास्क संपल्यानंतर तेच सदस्य एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसतात. नुकताच याने त्याचा दवाखान्यातील अनुभव मीरा जगन्नाथसोबत शेअर केला. तो अनुभव ऐकताना मीराच्या अंगावरही काटा आला. उत्कर्ष डॉक्टर असल्याने हा प्रसंग त्याने स्वतः घडताना पाहिला. उत्कर्ष प्रॅक्टिस करत असताना घडलेला प्रसंग होता. उत्कर्ष म्हणाला, 'तुला किस्सा सांगतो तो मला अजूनही आठवतो. पुरुषांच्या औषध देण्याच्या वॉर्डमध्ये माझी ड्युटी होती. तेव्हा मी इंटर्नशिपला होतो त्या आजी आल्या आणि माझ्या पाया पडून रडायला लागल्या. मला म्हणाल्या, डॉक्टर माझ्या मुलाला वाचवा. मला कळेना काही आणि मुलगा दारू प्यायलेला यकृत खराब झालेलं, तरी तिची माया त्याच्यासाठी तसूभरही कमी झाली नव्हती. मी आतून हललो आणि वाटलं काय माणसाचं जीवन आहे. त्या आजीला अजूनही वाटत होतं की तिच्या मुलाने जगावं.' पुढे उत्कर्ष म्हणाला, 'खरच तरुण मुलगा होता. यकृत खराब झालेलं आणि त्याचा मृत्यू झाला. केस झाली. गेट बंद केलेलं. त्याची बायको बाहेरून आरडाओरडा करत होती. मला माझ्या नवऱ्याला भेटायचंय. आम्ही तिथेच राउंड मारत होतो. मृतदेह तिथेच होता. तिला आत सोडलं ती चालत आली आणि मृतदेहाला म्हणाली, चला उठा...उठा उठा आपल्याला घरी जायचंय. तिच्या हातात छोटंसं बाळ होतं. ती म्हणाली, आताच तर आपल्याला बाळ झालंय. चार महिने झालेत. सर तिथे उभे होते आणि मी बघत होतो. मला वाटलं की माणसाच्या भावना कशा असतात. काय उठणार तो. उठा उठा म्हणत डॉक्टरला पकडलं तिने. माझा नवरा परत द्या मला म्हणाली. म्हणून मला त्या गोष्टीची जास्त जाणीव झाली की आपण कितीही भांडलो तरी अशा वेळेस काहीही आठवत नाही. सगळं विसरून जातो आपण.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3d9PLFt