Full Width(True/False)

अभिनेत्री नोरा फतेही हिला देखील करोनाची लागण

मुंबई : देशात आणि राज्यात पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याच्या बातम्या सातत्याने येत आहे. यामध्ये आणखी एका अभिनेत्री भर पडली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री हिला करोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंदी सिनेमासृष्टीतील अनेक कलाकारांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये करीना कपूर, अमृता अरोरा, सीमा खान, महीप कपूर यांना ही करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर अर्जुन कपूर, त्याची बहिण अंशुला कपूर, अनिल कपूरची मुलगी रिया कपूर आणि तिचा नवरा करण बुलानी यांना ही करोनाची लागण झाली आहे. आता यामध्ये नोरा फेतही हिची भर पडली आहे. नोराच्या प्रवक्त्याने तिच्या तब्येतीबद्दल एक प्रसिद्धपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यातच म्हटेल आहे की, 'नोरा फेतही हिला २८ डिसेंबर रोजी करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नोरा करोनाच्या संदर्भातील सर्व नियमांचे काटोकोर पालन करत आहे. ती घरातच क्वारंटाईन असून डॉक्टर तिच्या तब्येतीवर लक्ष ठवून आहेत. त्याचप्रमामे मुंबई महापालिकेच्या अधिका-यांशी संपूर्ण सहकार्य केले जात आहे.' नोरा फतेही हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याबद्दल तिच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'नोराचे जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते जुन्या कार्यक्रमातील आहेत. नोरा अलिकडेच कुठेही कार्यक्रमात सहभागी झालेली नव्हती. त्यामुळे जे फोटो व्हायरल होत आहे, त्याकडे दुर्लक्ष करा. ते जुने आहेत.' दरम्यान, नोराने देखील तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून करोना झाल्याचे चाहत्यांना सांगितले आहे. गायक गुरू रंधावा याच्या नवीन गाण्याच्या व्हिडिओमध्ये नोरा फतेही हिने डान्स केला आहे. या गाण्याच्या प्रमोशन कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. तसेच काही दिवसांपूर्वी हे दोघेजण इंडियाज बेस्ट डांसर आणि द कपिल शर्मा शो मध्ये सहभागी झाले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3EEYxXj