Full Width(True/False)

Mobile Recharge Plans: मस्तच! Jio आणि BSNL चे नवीन वर्षाचे शानदार गिफ्ट, या प्लान्समध्ये मिळेल ६० दिवसांची अतिरिक्त वैधता

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या यूजर्सला आकर्षित करण्यासाठी नवनवीन ऑफर्स आणत असतात. आता रिलायन्स आणि ने नवीन वर्षाच्या निमित्ताने एक खास ऑफर आणली आहे. या दोन्ही कंपन्या वर्षभराच्या वैधतेसह येणाऱ्या प्लान्सवर ६० दिवसांपर्यंतची अतिरिक्त वैधता देत आहे. या प्लान्समध्ये दररोज ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक शानदार बेनिफिट्स मिळतील. वाचा: बीएसएनएलच्या या प्लानवर न्यू इयर ऑफर बीएसएनएलच्या २,३९९ रुपयांच्या प्लानवर न्यू इयर ऑफर मिळत आहे. या प्लानमध्ये यूजर्सला ३६५ दिवसांऐवजी ४२५ दिवसांची वैधता मिळेल. ६० दिवसांच्या अतिरिक्त वैधतेसाठी हा प्लान घेण्याची यूजर्सकडे शेवटची संधी आहे. या प्लानमध्ये यूजर्सला दररोज ३ जीबीपर्यंत डेटा देखील मिळेल. डेटा लिमिट समाप्त झाल्यानंतर इंटरनेट स्पीड ८० Kbps होईल. प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस आणि देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा मिळते. तसेच, अतिरिक्त बेनिफिट्समध्ये इरॉज नाउचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये मिळेल अतिरिक्त वैधता जिओ आपल्या न्यू इयर ऑफर अंतर्गत २५४५ रुपयांच्या वर्षभराच्या प्लानवर २९ दिवसांची अतिरिक्त वैधता देत आहे. कंपनीच्या या ऑफरचा लाभ २ जानेवारीपर्यंत घेता येईल. या प्लानमध्ये यूजर्सला दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pHdu6N