नवी दिल्ली : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix ने आपल्या नवीन उपकरणाची घोषणा केली असून इंटेलच्या कोर प्रोसेसरसह येणारा लॅपटॉप भारतात ८ डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. लाँच नंतर हा लॅपटॉप फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. यामध्ये ६५ W फास्ट चार्जिंग सपोर्टही दिला जाईल. वाचा: या असतील सुविधा: हे डिव्हाइस अनेक नवीन वैशिष्ट्यांसह देखील येईल. यात थेट मदरबोर्डवरून माइक आणि कॅमेरा चालू आणि बंद करण्यासाठी भौतिक गोपनीयता स्विच. बॅकलिट कॅमेरा, NVMe PCIe 3.0 SSD स्टोरेज, फिंगरप्रिंट सेन्सर असेल. याच्या किंमतीबद्दल माहिती देण्यात आलेली नाही, परंतु त्याचे फीचर्स लक्षात घेता हा लॅपटॉप चांगला मानला जाऊ शकतो. InBook X1 लॅपटॉप 330 nits च्या पीक ब्राइटनेससह १४ -इंचाचा IPS डिस्प्ले असेल. लॅपटॉपमध्ये इंटेल कोर i3, i5 आणि i7 दिले जात आहेत, यात १६ GB पर्यंत रॅम आणि५१२ GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज असेल. लॅपटॉपमध्ये LPDDR4X रॅम आहे. Infinix Inbook X1 लॅपटॉपमध्ये ५५ Whr बॅटरी आहे जी ६५ W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. लॅपटॉपचे वजन फक्त १.८ किलो असून लॅपटॉपमध्ये दोन यूएसबी टाइप सी पोर्ट, दोन यूएसबी ३.० पोर्ट, यूएसबी २.० पोर्ट, एक मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, एचडीएमआय पोर्ट, वाय-फाय 5 आणि ब्लूटूथ v5.1 आहे. या लॅपटॉप्सना देईल टक्कर हा लॅपटॉप एचपी, डेल आणि असुसच्या लॅपटॉपशी टक्कर देईल. Dell 14 (2021) i3 जो टच स्क्रीनसह येतो आणि ८ GB रॅम आणि ५१२ GB स्टोरेज आहे. हा स्टायलिश डिझाईनचा फोल्डेबल लॅपटॉप आहे, ज्याची किंमत ६२,९९ रुपये आहे. दुसरीकडे, HP चा DA0070TX लॅपटॉप ८ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेजसह येतो आणि त्याची किंमत ४९,२८१ रुपये आहे. Asus VivoBook K15 OLED लॅपटॉप ८ GB रॅम आणि १ TB स्टोरेजसह ४६,९९९ रुपयांना खरेदी करता येतो. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3obJEa2