Full Width(True/False)

Video- फिरण्यासाठी विकीची जुनी गाडी वापरतेय कतरिनाची आई?

मुंबई : आणि यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. लग्नाची तयारी सुरू असताना एक वेगळाच व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावरही व्हिडिओची चर्चा आहे. विशेष म्हणजे नेटकरी यावर वेगवेगळ्या कमेन्ट करत आपलं मत देत आहेत. काय आहे व्हिडिओमध्ये सोशल मीडियावर कतरिनाची आई सुझान वापरत असलेल्या गाडीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ई-टाइम्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला. यात कतरिनाची आई पांढऱ्या रंगाच्या मर्सिडीज बेंझ जीएलसी गाडीत बसताना दिसत आहेत. या गाडीचा नंबर जेव्हा युझर्सने पाहिला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ही विकीची गाडी आहे. त्यानंतर या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेन्ट करायला सुरुवात केली. एका युझरने लिहिले की, 'ही तर विकीची गाडी आहे...' तर आणखी एका युझरनेही लिहिले की,'ही विकीची जुनी गाडी आहे...' आणखीही काही विकीच्या चाहत्यांनी अशाच प्रकारच्या कमेन्ट केल्या. दरम्यान, ही गाडी विकीची सगळ्यात आवडती गाडी आहे. यावर्षी जुलै महिन्यात विकीने रेंज रोवर गाडी विकत घेतली होती. या दोन गाड्यांव्यतिरीक्त विकीकडे बीएमडब्ल्यू एक्स ५ ही गाडीही आहेच. विकी- कतरिनाचा लग्नसोहळा ७ ते ९ डिसेंबरलाविकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे लग्न होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या दोघांचा लग्न सोहळा तीन दिवस चालणार आहे. ७ डिसेंबरला मेहंदी सोहळा, ८ डिसेंबरला संगीत सोहळा आणि ९ डिसेंबरला या दोघांचा शाही विवाह सोहळा होणार आहे. कतरिना- विकीचं लग्न राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स या ७०० वर्ष जुन्या किल्ल्याच्या रिसॉर्टमध्ये होणार आहे. या विवाहसोहळ्याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. त्यामुळेच अद्याप या दोघांकडून लग्नाबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3EuZtOL