Full Width(True/False)

जॅकलिनला भेट म्हणून सुकेशने दिलेली ९ लाखांची मांजर!

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आणि २०० कोटींचा घोटाळा करणारा यांच्यातील नातेसंबंध आता उघड होत आहेत. जॅकलिन आणि सुकेश यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टींचा आता खुलासा होत आहे. कोट्यवधींची चोरी केल्याप्रकरणी ईडीने आरोपी सुकेश, त्याची पत्नी मारिया आणि इतर सहा आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटनुसार, सुकेश आणि जॅकलिन एकमेकांना डेट करत होते. इतकंच नाही तर सुकेशने जॅकलिनला लाखो रुपयांच्या भेटवस्तू देखील दिल्या होत्या. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, सुकेश आणि जॅकलिन डेट करत असल्याने सुकेशने जॅकलिनला तब्बल ५२ लाखांचा घोडा भेट केला होता. यासोबतच ९ लाखांची मांजर देखील भेट दिली होती. याशिवाय आणखीही अनेक महागड्या भेटवस्तू सुकेशने जॅकलिनला दिल्या होत्या. या चार्जशीटमध्ये जॅकलिनसोबतच अभिनेत्री नोरा फतेही हिचं देखील नाव आहे. नोराला देखील सुकेशने अत्यंत महागडी गाडी भेट दिली होती. सुकेश प्रकरणासंबंधी ईडीने नोरा आणि जॅकलिन दोघींचीही चौकशी केली आहे.नोराने एक पत्रक जाहीर करत हे स्पष्ट केलं आहे की ती या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा भाग नाही तर ती स्वतः या रॅकेटची बळी ठरली आहे. या चौकशीत जॅकलिनने सुकेशसोबत आपला काहीही संबंध नसल्याचं कबुल केलं आहे. परंतु, जॅकलिनने उघडपणे हे कबुल केलं असताना तिचे आणि सुकेशचे अनेक प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात सुकेश आणि जॅकलिन एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. जॅकलिन सुकेशच्या गालावर किस करताना दिसतेय. या संपूर्ण प्रकरणामुळे जॅकलिन आणखी अडचणीत सापडली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pwL2Dy