Full Width(True/False)

Reliance Jio: जिओ प्रीपेड यूजर्सला पुन्हा एकदा झटका, आता सर्व प्लान्सवर मिळणार नाही ‘हे’ बेनिफिट्स

नवी दिल्ली : चे रिचार्ज प्लान १ डिसेंबर २०२१ पासून महाग झाले आहेत. कंपनीच्या प्लान्सच्या किंमती जवळपास ५०० रुपयांपर्यंत वाढल्या आहे. जिओने काही नवीन प्लान्स देखील सादर केले आहेत. यासोबतच, सध्या बहुतांश प्लानमध्ये Disney+ Hotstar Mobile सबस्क्रिप्शन देणे देखील बंद केले आहे. वाचा: जिओच्या वेबसाइटनुसार, कंपनीच्या केवळ एकाच प्लानवर डिज्नी+ हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन दिले जात आहे. जिओच्या या प्लानची किंमत ६०१ रुपये आहे. या प्लानमध्ये काय काय बेनिफिट्स मिळतात जाणून घेऊया. रिलायन्स जिओच्या ६०१ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये १ वर्षासाठी Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन दिले जात आहे. जिओचा हा प्लान ४०१ रुपयांचा होता. मात्र, किंमत वाढल्यानंतर आता ६०१ रुपये मोजावे लागतील. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. यूजर्सला या प्लानमध्ये ३ जीबी डेटा मिळतो. तसेच, ६ जीबी अतिरिक्त डेटा दिला जातो. प्लानमध्ये एकूण ९० जीबी डेटा मिळतो. याशिवाय या प्लानमध्ये यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच अ‍ॅप्सचा देखील मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. दरम्यान, जिओने ठराविक प्रीपेड प्लान्ससोबत Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन देणे बंद केले असले, तरीही पोस्टपेड प्लान्ससोबत मात्र सबस्क्रिप्शन मिळत आहे. सोबतच, कंपनी नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप देखील देते. या प्लान्सची सुरुवाती किंमत ३९९ रुपये आहे. या प्लानमध्ये यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि एकूण ७५ जीबी डेटा मिळतो. हा डेटा समाप्त झाल्यानंतर प्रती जीबीसाठी १० रुपये द्यावे लागतील. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3I6LL6V