नवी दिल्ली : फोन रिचार्जवर कॉलिंगसह शॉपिंग बेनिफिट मिळाल्यास नक्कीच फायद्याचे ठरेल. टेलिकॉम कंपनी ग्राहकांना अशीच सुविधा देत आहे. कंपनीच्या काही प्लान्सवर कॅशबॅक मिळत आहे. या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: जिओने कॅशबॅक ऑफरसह तीन नवीन ्स सादर केले आहेत. प्लान्सच्या किंमती वाढवल्यानंतर आता कंपनी तब्बल २० टक्के कॅशबॅक देत आहे. यात ७१९ रुपये, ६६६ रुपये आणि २९९ रुपयांच्या प्लान्सचा समावेश आहे. कॅशबॅक यूजर्सच्या जिओमार्ट अकाउंटमध्ये जमा केले जाईल. यूजर्स याद्वारे शॉपिंग करू शकतात रिलायन्स जिओचे ७१९ रुपये, ६६६ रुपये आणि २९९ रुपयांचे प्रीपेड प्लान कंपनीच्या ६६६ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. तर ७१९ रुपये आणि २९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. २९९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस, तर ७१९ रुपये आणि ६६६ रुपयांच्या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. या सर्व प्लान्समध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय जिओ अॅप्सचा देखील मोफत अॅक्सेस मिळतो. प्लानमधील डेटा समाप्त झाल्यानंतर यूजर्सला ६४ केबीपीएसने इंटरनेट वापरता येईल. ७१९ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण १६८ जीबी, ६६६ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण १२६ जीबी डेटा आणि २९९ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. दरम्यान, जिओने काही दिवसांपूर्वीच आपल्या प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहे. २९९ रुपयांच्या प्लानची किंमत आधी २४९ रुपये होती. तर ६६६ रुपयांचा प्लान ५५५ रुपये आणि ७१९ रुपयांचा प्लान ५९८ रुपयांचा होता. कंपनीकडे दररोज २ जीबी डेटासह येणारा वर्षभराच्या वैधतेचा प्लान देखील आहे. या प्लानची किंमत २८७९ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DhzEQz