नवी दिल्ली : रेडमीने स्मार्टफोनचा नवा व्हेरिएन्ट भारतात लाँच केला असून या नवीन डिव्हाइसमध्ये सुधारित मेमरी अधिक रॅम आणि स्टोरेजसह देण्यात आली आहे. फोनची विक्री आजपासून म्हणजेच ३ डिसेंबरपासून सुरू होत आहे. Redmi Note 10S या वर्षी मे महिन्यात भारतीय बाजारात लाँच करण्यात आला होता. त्यावेळी हा स्मार्टफोन दोन प्रकारात सादर करण्यात आला होता. Device ६ GB RAM सह वेगवेगळ्या स्टोरेज प्रकारांमध्ये लाँच केले गेले होते. वाचा: आता Redmi Note 10S चा ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज पर्याय लाँच करण्यात आला आहे. या व्हेरिएंटची किंमत १७,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हे डिव्हाईस Amazon.com, Mi.com आणि Mi Home वरून खरेदी केले जाऊ शकते. Note 10S चा ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज पर्याय १६,४९९ रुपयांना विकला जात आहे. त्याच्या ६ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज पर्यायाची किंमत १४, ९९९ रुपये आहे. काही महिन्यांपूर्वी Redmi Note 10S चा कॉस्मिक पर्पल कलर व्हेरियंट देखील लाँच करण्यात आला होता. Redmi Note 10S चे स्पेसिफिकेशन्स: Redmi Note 10S मध्ये १०८०x२४०० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.४३ इंचाचा फुल HD + डिस्प्ले आहे. याच्या वरच्या बाजूला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ देण्यात आला आहे. हा फोन ड्युअल सिम सपोर्टसह येतो आणि Android 11 आधारित MIUI 12 वर चालतो. Redmi Note 10S मध्ये MediaTek Helio G95 प्रोसेसर ८ GB पर्यंत RAM आणि १२८ GB पर्यंत स्टोरेजसह समर्थित आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने त्याची स्टोरेज वाढवता येऊ शकते. Redmi Note 10S च्या मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी, समोर १३-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये ३३ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32WEQwY