मुंबई- सलमान खानची नायिका हिने त्याच्यासोबत 'जुडवा' (१९९७), 'बंधन' (१९९८) या सिनेमांत काम केलं होतं. बॉलिवूडमध्ये काही हिट सिनेमे दिल्यानंतर रंभा अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. यानंतर तिने काही तमिळ सिनेमांमध्ये काम केलं. मात्र लग्नानंतर रंभाने झगमगत्या दुनियेपासून दूर रहाणं पसंत केलं. रंभाने २०१० मध्ये कॅनेडियन उद्योगपती इंद्रकुमार पथमनाथन यांच्याशी लग्न केले. तिच्या न्या इन्स्टाग्राम फोटोंमध्ये रंभाला अजिबात ओळखता येत नाहीए. रंभाने तिच्या इन्स्टाग्रामवर खासगी आयुष्याशी निगडीत अनेक फोटो शेअर केलेत. काही फोटोंमध्ये अभिनेत्री तिच्या तीनही मुलांसोबत आणि पती इंद्रकुमारसोबत दिसते. सध्या रंभा तिच्या कुटुंबासह टोरंटोमध्ये राहत आहे. रंभाला लानिया आणि साशा या दोन मुली आहेत. २०१८ मध्ये तिने मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव शिवीन आहे. दाक्षिणात्य सिनेमांमध्ये रंभाने रजनीकांत, कमल हसन, विजय आणि अजित यांसारख्या आघाडीच्या कलाकारांसोबत काम आहे. दशकभरापूर्वी रंभाने सिनेसृष्टी सोडली. अलीकडेच एप्रिलमध्ये रंभाने लग्नाचा ११ वा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्रीने तिच्या मुलीने बनवलेल्या कार्डचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dfKrAn