Full Width(True/False)

Smart TV Offers: ४० इंचाचा हा स्मार्ट टीव्ही चक्कं १० हजारांपेक्षा कमीमध्ये खरेदी करण्याची संधी, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: फ्लिपकार्ट टीव्ही डेज सेलला सुरुवात झाली असून ग्राहकांना ३ डिसेंबर पर्यंत या सेलचा लाभ घेता येणार आहे. या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही खूपच स्वस्त मिळत असून Mi, OnePlus, Realme, Samsung आणि Motorola च्या स्मार्ट टीव्हीवर उत्तम डील्स मिळत आहेत. जर तुम्ही जुना टीव्ही बदलून नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य संधी आहे. वर्षाच्या शेवटी, स्मार्ट टीव्हीवर आश्चर्यकारक ऑफर देण्यात येत आहेत. Motorola चा ४० इंचाचा स्मार्ट टीव्ही तुम्ही चक्कं १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळवू शकता. वाचा: इंच फुल HD LED Smart Android TV: Motorola ZX2 40 इंच फुल HD LED Smart Android TV ची लाँच किंमत ३९,९९९ रुपये आहे. पण Flipkart सेलमध्ये टीव्हीवर ४५ % डिस्काउंट आहे. म्हणजेच हा टीव्ही २१,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरद्वारे, तुम्ही टीव्ही याहून अधिक स्वस्तात टीव्ही खरेदी करू शकाल. जाणून घेऊया. तुम्ही सिटी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला १५०० रुपयांपर्यंत सूट मिळेल. म्हणजेच स्मार्ट टीव्हीची किंमत २०,४९९ रुपये असेल. यावर एक एक्सचेंज ऑफर देखील आहे. MOTOROLA ZX2 40 Inch Full HD LED Smart Android TV वर ११ हजाराची एक्सचेंज ऑफर आहे. म्हणजेच, जर तुम्ही तुमचा जुना टीव्ही बदललात तर तुम्हाला इतकी सूट मिळू शकते. तुमच्या जुन्या टीव्हीची स्थिती चांगली आणि मॉडेल नवीन असेल तेव्हाच तुम्हाला ११ हजारांपर्यंत सूट मिळेल. पूर्ण ऑफ मिळविण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला ९,४९९ रुपयांमध्ये हा स्मार्ट टीव्ही घरी आणता येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3odqYqc