Full Width(True/False)

Smartphones launch 2022: नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास या महिन्यात लाँच झालेल्या शानदार फोन्सची लिस्ट पाहाच

२०२२ हे नवीन वर्ष स्मार्टफोन कंपन्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात अनेक फोन लाँच झाले आहेत. याशिवाय, जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यात, जगातील सर्वात मोठा टेक शो, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES 2022) देखील पार पडला. ज्यामध्ये अनेक प्रोडक्टस लाँच करण्यात आले. Xiaomi ने भारतात नवीन वर्षाची सुरुवात Xiaomi 11i हायपरचार्ज 5G आणि Xiaomi 11i 5G स्मार्टफोन्सने केली आहे. Xiaomi 11i हायपरचार्ज 5G हा भारतातील सर्वात जलद चार्ज होणारा स्मार्टफोन आहे. यात १२० W चार्जिंग आहे, ज्याचा दावा आहे की फोनची बॅटरी अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण होईल. या महिन्यात भारतीय बाजारात लाँच झालेल्या काही स्मार्टफोन्सची सविस्तर माहिती जाणून घेऊया. या लिस्टमध्ये Vivo V23 5G, Moto G71 5G सारख्या जबरदस्त फोन्सचा समावेश आहे.

Tecno Pop 5 LTE
Tecno Pop 5 LTE

Tecno Pop 5 LTE भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. टेक्नोच्या पॉप सिरीजचा हा नवीन सदस्य आहे. Tecno Pop 5 LTE ला ५००० mAh बॅटरीचे समर्थन आहे आणि ते १४ स्थानिक भाषांना देखील समर्थन देते. Tecno Pop 5 LTE गेल्या वर्षी पाकिस्तान आणि फिलीपिन्समध्ये लाँच करण्यात आले होते. Tecno Pop 5 LTE मध्ये ६.५२ -इंचाचा डिस्प्ले आहे. Tecno Pop 5 LTE ची किंमत ६,२९९ रुपये आहे. Tecno Pop 5 LTE Amazon India वरून खरेदी केला जाऊ शकतो.

Vivo Y33T
Vivo Y33T

Vivo India ने Vivo Y33T भारतात लाँच केला आहे. नवीन फोन Vivo Y21T ची अपग्रेड आवृत्ती आहे जी गेल्या आठवड्यात भारतात लाँच झाली होती. Vivo Y33T पूर्वीपेक्षा जास्त रॅम आणि अपग्रेडेड कॅमेरा सह सादर करण्यात आला आहे. Vivo Y33T मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. याशिवाय यात स्नॅपड्रॅगन ६८० प्रोसेसर आणि ५००० mAh बॅटरी आहे. Vivo Y33T ची किंमत १८,९९० रुपये ठेवण्यात आली आहे. फोन याच प्रकारात ८ GB रॅम सह १२८ GB स्टोरेज वेरिएंट सादर करण्यात आला आहे.

Moto G71 5G
Moto G71 5G

Moto G71 5G गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये युरोपमध्ये लाँच झाला होता. Moto G71 5G सोबत Snapdragon 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. या प्रोसेसरसह भारतात लाँच होणारा हा कोणत्याही कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे. Moto G71 5G मध्ये १३ 5G बँड समर्थित आहेत. याशिवाय फोनमध्ये AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, भारतीय बाजारात Moto G71 5G ची किंमत १८,९९९ रुपये आहे.

OPPO A16K:

Oppo ने भारतीय बाजारात आपला एंट्री लेव्हल स्मार्टफोन OPPO A16K लाँच केला आहे. OPPO A16K हा सिंगल रियर कॅमेरा असलेला एंट्री लेव्हल फोन आहे. फोनसोबत MediaTek Helio G35 प्रोसेसर, ३ GB रॅम आणि ३२ GB स्टोरेज देण्यात आले आहे. हा फोन भारतापूर्वी फिलीपिन्समध्ये लाँच करण्यात आला आहे.

Xiaomi 11i Hypercharge 5G
Xiaomi 11i Hypercharge 5G

Xiaomi 11i अंतर्गत, Xiaomi 11i हायपरचार्ज 5G आणि Xiaomi 11i 5G स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आले आहेत. यापैकी, Xiaomi 11i हायपरचार्ज 5G हा भारतातील सर्वात वेगवान चार्जिंग स्मार्टफोन आहे. यासह, १२० W चार्जिंगसाठी समर्थन आहे, ज्याचा दावा आहे की, फोनची बॅटरी फक्त १५ मिनिटांत पूर्ण होईल. Xiaomi 11i 67 W च्या फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे. Xiaomi 11i सीरिजमधील या दोन्ही फोनमध्ये १२० Hz रिफ्रेश रेटसह सुपर AMOLED डिस्प्ले आहे.

Vivo V23 5G
Vivo V23 5G

Vivo V23 5G आणि Vivo V23 Pro 5G स्मार्टफोन Vivo V23 5G सीरीज अंतर्गत भारतीय बाजारात लाँच करण्यात आले आहेत. Vivo V23 Pro 5G हा भारतीय बाजारपेठेत लाँच झालेला पहिला स्मार्टफोन आहे, ज्याचे रंग आपोआप बदलतात. Vivo V23 5G मालिकेत ट्रिपल रिअर कॅमेरा उपलब्ध असेल. यात १०८ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. याशिवाय फोनमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा देखील आहे. फोनमध्ये MediaTek डायमेंशन १२०० प्रोसेसर देण्यात आला आहे. Vivo V23 5G मालिकेची सुरुवातीची किंमत २९,९९० रुपये आहे

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3HYvQqn