नवी दिल्ली : टॅरिफमध्ये वाढ केल्यानंतर रिलायन्स जिओने आपल्या पोर्टफोलियामध्ये अनेक नवीन प्लान्स जोडले आहेत, तर काही प्लान्सला हटवले आहे. आता यूजर्ससाठी कंपनीने एक शानदार प्लान आणला आहे. रिपोर्टनुसार, जिओने ४९९ रुपयांचा प्लान परत आणला आहे. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा आणि सबस्क्रिप्शन मिळते. प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचाः ४९९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता २८ दिवस असून, यामध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये नवीन यूजर्सला प्राइम मेंबरशिपचे सबस्क्रिप्शन देखील मिळते. दररोजचा २ जीबी डेटा समाप्त झाल्यानंतर स्पीड ६४ केबीपीएस होईल. याशिवाय या प्रीपेड प्लानमध्ये Disney+ Hotstar चा देखील अॅक्सेस मिळतो. प्लानमध्ये वर्षासाठी मोफत डिज्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. यामध्ये जिओ अॅपचा देखील अॅक्सेस मिळतो. जिओचा ६०१ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओचा ६०१ रुपयांचा प्लान ओटीटी सबस्क्रिप्शनसह येतो. या प्लानची वैधता २८ दिवस असून यात अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोज ३ जीबी डेटा मिळतो. याशिवाय ६ जीबी अतिरिक्त डेटा देखील दिला जात आहे. जिओच्या या प्लानमध्ये एक वर्षासाठी Disney+ Hotstar मोबाइलचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. जिओचा ७९९ रुपयांचा प्लान डिज्नी+ हॉटस्टार सबस्क्रिप्शनसह येणारा हा प्लान आहे. या प्लानची किंमत आधी ६६६ रुपये होती. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लानची वैधता ५६ दिवस आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3t07FDw