Full Width(True/False)

गायन व अभिनयानंतर केतकी माटेगांवकरचं एक पाऊल पुढे; 'या' क्षेत्रात पदार्पण

मुंबई: गायन व अभिनय क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करणाऱ्या केतकी माटेगांवकरनं आता संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ‘मला संगीताच्या माध्यमातून व्यक्त व्हायला आवडतं. माझ्यासाठी हा योग्य मार्ग आहे. एखाद्या गाण्याकडे, चालीकडे पाहण्याचा एका स्त्री संगीतकाराचा एक वेगळा दृष्टिकोन या निमित्तानं श्रोत्यांना अनुभवता येईल,’ असं केतकीनं आपल्या नव्या इनिंगविषयी सांगितलं. संगीत क्षेत्रात , , आणि अलीकडच्या काळात वैशाली सामंत या बोटावर मोजता येतील इतक्याच महिला संगीतकार डोळ्यासमोर येतात. हे चित्र बदलावं आणि संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी काही प्रमाणात तरी संगीत दिग्दर्शन क्षेत्राकडे वळावं, असंही मत तिनं नमूद केलं. केतकीनं संगीतबद्ध केलेल्या पहिल्याच अल्बममध्ये महालक्ष्मी अय्यर, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, रघुनंदन पणशीकर आणि सुवर्णा माटेगांवकर या कलाकारांनी गायन केलं आहे. यामध्ये दोन भागांत नऊ गाणी असतील. केतकीची पणजी सौदामिनी माटेगांवकर अर्थात माई यांच्या रचना यामध्ये संगीतबद्ध करण्यात आल्या असून, धार्मिक, सकारात्मक, भक्तीमय भाव हे याचे वैशिष्ट्य आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/fVeQm8xnD