नवी दिल्ली : उद्या (१४ जानेवारी) भारतीय बाजारात आपला नवीन OnePlus 9RT लाँच करणार आहे. टिप्स्टर योगेश ब्रारने फोनची किंमत, कलर व्हेरिएंट्स आणि सेलची माहिती दिली आहे. वाचा: रिपोर्टनुसार, ९आरटी स्मार्टफोनला ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केले जाईल. फोनच्या ८ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ४२,९९९ रुपये आणि १२ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ४६,९९९ रुपये असेल. फोनला १७ जानेवारीपासून सिल्वर आणि ब्लॅक रंगात खरेदी करू शकता. १७ जानेवारीपासून अॅमेझॉन रिपब्लिक डे सेलमध्ये फोनला खरेदी करू शकता. फोनवर आकर्षक ऑफर्सचा देखील फायदा मिळेल. वनप्लस 9RT चे फीचर आणि स्पेसिफिकेशन फोनमध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा ६.६२ इंच पंच-होल फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले मिळेल. यात १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेटचा सपोर्ट मिळेल. फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोटोग्राफीसाठी यात ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, १६ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि एक २ मेगापिक्सल मॅक्रो शूटर मिळेल. तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात पॉवरसाठी ६५टी वार्प चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोन अँड्राइड १२ अथवा अँड्राइड ११ सह येऊ शकतो. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GosBrD