नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कडे अनेक प्रीपेड प्लान आहेत. जे कमी किंमतीत जबरदस्त बेनिफिट्स देतात. या प्लानमध्ये ३० दिवस ते ३०० दिवसांपर्यंत वैधता आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी बीएसएनएलच्या बेस्ट प्लान्सची यादी देत आहोत. ज्यात तुम्ही एका प्लानची निवड करू शकता. तसेच अनेक बेनिफिट्स मिळवू शकतात. BSNL चा ३९७ रुपयाचा प्लान बीएसएनएलचा ३९७ रुपयाचा रिचार्ज प्लान सर्वात लोकप्रिय प्रीपेड प्लानपैकी एक आहे. या प्लानमध्ये यूजर्संना ६० दिवसाची वैधता मिळत असून अनलिमिटेड व्हाइस कॉल आणि रोज २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, प्लानमध्ये १०० फ्री एसएमएस मिळते. एक फ्री पर्सनलाइज्ड रिंग बॅक टोन (पीआरबीटी) मिळते. प्लानमध्ये डेली २ जीबी डेटा पर्यंत फास्ट इंटरनेट स्पीड मिळते. डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 80 Kbps पर्यंत होते. याशिवाय, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. BSNL चा ३९९ रुपयाचा प्लान हा ३९९ रुपयाचा प्लान ३९७ रुपयाच्या प्लानशी मिळता जुळता आहे. परंतु, हा १ जीबी डेटा सोबत ८० दिवसासाठी येतो. सोबत या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळते. BSNL चा २४७ रुपयाचा प्लान बीएसएनएलचा २४७ रुपयाचा प्रीपेड प्लान असून यात अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि ५० जीबी डेटा दिला जातो. या पॅकेज मध्ये रोज १०० एसएमएस, ३० दिवसापर्यंत वैधता मिळते. BSNL चा ११८ रुपयाचा प्लान या प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग सोबत ०.५ जीबी डेली डेटा मिळतो. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 40 केबीपीएस होते. या प्लानमध्ये एसएमएस बेनिफिट मिळत नाही. BSNL चा २४९ रुपयाचा प्रीपेड प्लान बीएसएनएलचा २४९ रुपयाचा प्रीपेड प्लानमध्ये ६० दिवसाची वैधता मिळते. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. हा प्लान ऑफरचा पहिला रिचार्ज कूपन आहे. नवीन यूजर्ससाठी फक्त बीएसएनएलवर लागू आहे. एकदा डेली २ जीबी डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 40 kbps होते. BSNL चा २९८ रुपयाचा टॅरिफ व्हाउचर बीएसएनएलचा एक २९८ रुपयाचा स्पेशल व्हाउचर सुद्धा आहे. २९८ रुपयाचा प्लान ५६ दिवसासाठी वैध आहे. यात अनलिमिटेड फोन कॉल, १ जीबी डेली ब्रॉडबँड आणि १०० एसएमएसचा समावेश आहे. BSNL चा १८७ रुपयाचा प्लान हा प्रीपेड प्लान तुम्हाला अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग सोबत दुसरे बेनिफिट्स देतो. ज्यात ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस सारखे बेनिफिट दिले जातात. या प्लानसोबत बीएसएनएल ट्यून्सचे ऑफर सुद्धा दिले जाते. हा २८ दिवसाच्या वैधतेसोबत येतो. हा बेस्ट प्लान्स पैकी एक आहे. परंतु, यात ४ जी नेटवर्कची कमतरता भासू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zkfK7k