Full Width(True/False)

अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा' वर क्रिकेटर डेविड वॉर्नरचा Video

मुंबई- तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या '' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सुपरहिट चित्रपटाने फक्त तेलगूच नाही तर इतर भाषांमध्येही दमदार व्यवसाय केला आहे. विशेष म्हणजे फक्त भारतातच नाही तर परदेशातही या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ने या सिनेमातील सुपरहिट डायलॉगवर लिपसिंक करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहत्यांनाही डेविडचा हा व्हिडिओ प्रचंड आवडला. लिपसिंकचा व्हिडिओ बनवण्याची डेविडची ही काही पहिलीच वेळ नाही. तो अनेकदा हिंदी सिनेमांतील डायलॉग आणि गाण्यांचे टिकटॉक व्हिडिओ शेअर करत असतो. आता त्याने 'पुष्पा' सिनेमातील अल्लू अर्जुनच्या हिट डायलॉगचा व्हिडिओ शेअर केला आहे. सहा सेकंदांचा हा व्हिडिओ चाहते पुनः पुन्हा पाहत आहेत. इथे पाहा डेविड वॉर्नरचा सुपरहिट व्हिडिओ- ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये हैदराबाद संघाकडून खेळतो. त्याच्या या व्हिडिओवर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स गमतीने म्हणाला की, 'तू ठीक आहेस ना?' सध्या वॉर्नर आणि अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडत असून ते याला तुफान शेअर करत आहेत. अनेक चाहत्यांनी तर डेविड वॉर्नरला भारतीय नागरिकत्व द्यायला हवं असंही म्हटलं आहे. दरम्यान, आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत 'पुष्पा' हा सिनेमा या वर्षातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. आतापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १८८ कोटींहून अधिक कमाई केली आहे. सिनेमाच्या हिंदी व्हर्जननेही चांगली कामगिरी केली असून वर्षातील सुपरहिट सिनेमांमध्ये स्थान मिळवलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pTBhjW