Full Width(True/False)

लग्नाच्या आठ वर्षांनंतर कुणाल- नैना यांच्या घरी हलला पाळणा

मुंबई- 'रंग दे बसंती' आणि 'डॉन २' सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता कुणाल कपूरच्या घरात सध्या सारेच आनंदात आहेत. अभिनेत्याची पत्नी नैना बच्चन ने मुलाला जन्म दिला आहे. कुणाल कपूरने सोशल मीडियावर चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली असून, त्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडमधील हृतिक रोशननेही कुणालला पिता झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. कुणाल कपूरने इंस्टाग्रामवर आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'आमच्या सर्व हितचिंतकांसाठी, नैना आणि मला हे सांगताना आनंद होत आहे की आम्ही एका सुंदर मुलाचे अभिमानी पालक झालो आहोत. या मौल्यवान देणगीबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो.' कुणाल कपूरने २०१५ मध्ये नैना बच्चनशी लग्न केलं. नैना ही बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांची भाची आहे. कुणाल आणि त्याच्या पत्नीने गरोदरपणाची बातमी जगापासून लपवून ठेवली होती. सोशल मीडियावरही याबद्दल काही पोस्ट केलं गेलं नाही. नऊ महिन्यांमध्ये कुणालने नैनाचा एकही फोटो किंवा व्हिडिओ शेअर केला नाही. अशात ही आनंदाची बातमी खरोखरच सुखद धक्का म्हणावी लागेल. त्यानंतर लगेचच मित्र आणि चाहत्यांनी कुणालच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला. हृतिक रोशनने हार्ट इमोजी शेअर करत लिहिले की, 'ऋतिक माचूकडून'. हृतिक मामा आणि काका अशी दोन्ही कर्तव्य बजावताना दिसला. बॉलिवूडमधील तारा शर्मा, अंगद बेदी, अक्षय ओबेरॉय यांसारख्या स्टार्सनी कुणाल आणि नैनाचे अभिनंदन केले आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कुणाल सध्या दिग्दर्शक म्हणून आपली इनिंग सुरू करण्याच्या तयारीत आहे. तो लवकरच हिवाळी ऑलिम्पियन शिवा केशवन यांच्यावर चित्रपट बनवणार आहे. याशिवाय 'द एम्पायर' या वेबसीरिजमध्ये तो बाबरच्या भूमिकेत दिसला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/vixMFaYdA