नवी दिल्ली : Union २०२१ मध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या आयातीवर २.५ टक्के कस्टम ड्यूटी लावण्यात आली होती. याद्वारे भारत सरकार इलेक्ट्रॉनिक्सच्या स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. कंपोनेंटवर लावण्यात आलेल्या हाय ड्यूटीमुळे देशातीलच लोकल प्रोडक्शनवर कंपन्यांना निर्भर राहावे लागत आहे. परंतु, यामुळे स्मार्टफोनच्या किंमती देखील वाढल्या आहेत. यात चिप शॉर्टेज सारख्या गोष्टींचा देखील समावेश आहे. आज केंद्रीय सादर होणार असून, आज देशाचे बजेट सादर करतील. यावर्षी स्मार्टफोन इंडस्ट्रीला कंपोनेंट ड्यूटीमध्ये वाढ न होण्याची अपेक्षा आहे. एका रिपोर्टनुसार, Lava International चे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन Hari Om Rai यांच्यानुसार, इंडस्ट्रीच्या दोन मागण्यात आहेत. यातील एक कंपोनेंट ड्यूटीमध्ये वाढ करू नये. कारण यामुळे जागतिक स्पर्धेवर प्रभाव पडतो. तसेच, स्थानिक ब्रँडसाठी वेगळे बजेट बनवण्याची देखील मागणी आहे. Lava अशा प्रमुख भारतीय स्मार्टफोन ब्रँड्सपैकी एक आहे, जे अजून प्रोडक्ट्स लाँच करत आहेत. Intex Technologies आणि Karbonn Mobiles सारखे इतर ब्रँड्स चीनी कंपन्यांमुळे बंद झाले आहेत. दरम्यान, Lava ने आपला पहिला ५जी स्मार्टफोन Agni 5G ला भारतात गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लाँच केले होते. Micromax ने देखील पुन्हा बाजारात एंट्री केली आहे. Counterpoint Research नुसार, भारतीय बाजारात चीनी स्मार्टफोन ब्रँड्स जसे की Xiaomi, Vivo, Realme आणि Oppo चा दबदबा आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/xHsQjZKgt