मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द राइज' हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला आहे. हा सिनेमा आता ओटीटीवरही रिलीज झाला आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता अधिकच वाढली आहे. त्यातील अल्लू अर्जुनचा लुक, त्याची स्टाईल आणि त्याचे संवाद यांचीच सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अल्लू अर्जुनच्या स्टाईलमध्ये संवाद म्हणत व्हिडिओ करणाऱ्यांच्या यादीमध्ये मराठीमधील लोकप्रिय कलाकार यांचाही समावेश झाला आहे. मराठी नाटक, सिनेमा मालिकांमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रशांत दामले यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रशांत यांचा स्वतःचा असा चाहता वर्ग आहे. यामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत सर्व वयोगटातील प्रेक्षक आहेत. अभिनेत्याची विनोदबुद्धी, उत्तम टायमिंग, अभिनय यामुळे मराठी मनोरंजन विश्वामध्ये त्यांच्याकडे प्रत्येकजण आदाराने पाहतो. सध्या अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमाचा आणि त्यातील संवादांचा बोलबाला आहे. त्याची भुरळ दामलेंनाही पडली. मग त्यातूनच दामलेंनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये प्रशांत 'पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या फायर है में…' असे अल्लू अर्जुनच्या स्टाइलमध्ये म्हणताना दिसतात. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी 'काही तरीच होतंय हे!' अशी कॅप्शन दिली आहे. प्रशांत दामले यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर युझर्स संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काहींना दामले स्टाईलमध्ये सादर केलेला हा व्हिडिओ आवडला आहे. तर काहींना तो अजिबात आवडला नाही. तशी प्रतिक्रिया त्यांनी कमेन्टमधून व्यक्त ही केली. एका युजरने लिहिले की, 'प्लीज नको आपला मराठीचा दर्जा कितीतरी पटीने उच्च आहे आणि तुम्हीही कसलेले अभिनेते आहात, असले ५० कच्चे खाल, जो कुणी पुष्पा आहे तो थिल्लर वाटतो.' त्यावर लगेचच दामले यांनी उत्तर दिले. त्यांनी लिहिले की, 'थोडा टाइम पास हो उगाच..' असे म्हणत हसण्याची इमोजी पोस्ट केली आहे. आणखी एका युजरने प्रशांत दामले यांनी त्यांची बाजू घेतली आहे. त्याने म्हटले आहे की, 'प्रशांत दादांनी काही केले तरी छान वाटते ते... कम्माल!' दरम्यान, दामले यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर युझर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/lyheutB