मुंबई : आणि वादग्रस्त विधाने हे समीकरण झाले आहे. वादग्रस्त विधानांमुळेच कंगना ओळखली जाते. ती जेव्हा मुलाखती देते तेव्हा ती बॉलिवूडमधील काही लोकांवर तिच्या अंदाजामध्ये कायम टीका करत असते. अलिकडेच कंगनाने ती सूत्रसंचालन करत असलेल्या '' या रिअॅलिटी शोसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये देखील अशा काही लोकांना तिने पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. 'लॉकअप' कार्यक्रमाच्या प्रमोशन कार्यक्रमात कंगनाने पत्रकारांन सांगितले की, तिला 'बॉलिवूडमधील डॅडी'ची पर्वा नाही. तिच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्याचा संबंध करण जोहरशी जोडला आहे. लहानपणापासून अशीच आहे कंगनाला पत्रकार परिषदेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचे उत्तर देताना तिने सांगितले की, माझ्या वडिलांचेही मी कदी ऐकले नाही. तर बॉलिवूडमधील डॅडीचे मी का ऐकू. कंगनाने पुढे सांगितले की, 'लहानपणापासून मला कसलीच भिती वाटली नाही. लहान वयातच तिने घर सोडले. लोकांना वाटते करीअरमध्ये यशस्वी झाले म्हणून माझा स्वभाव असा आहे. तर हे साफ चुकीचे आहे. पहिल्यापासूनच माझा स्वभाव असाच आहे. आज ज्या ठिकाणी मी आहे, तिथे पोहचण्यासाठी मी खूप संघर्ष केला आहे.महिला सक्षमीकरणाच्या विचाराला प्रोत्साहन देणारे सिनेमे मी कायम निवडले. त्यातच मी काम केले. कायम माझ्या मनाचे ऐकले...' एकताबरोबर काम करण्याचे आव्हान कंगनाने सांगितले की, 'लॉकअप कार्यक्रमासाठी तू पूर्णपणे तयार झाली आहे. मी एकता कपूरबरोबर काम करते आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. तिच्यासोबत काम करणे आव्हानात्मक आहे. आव्हाने स्विकारायला मला आवडतात,. त्यामुळे जेव्हा हा कार्यक्रम करण्याची संधी मला मिळाली तेव्हा न घाबरता मी स्विकारली.' लॉकअप कार्यक्रमाचा टीझर रिलीज झाला आहे. त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. 'लॉक अप ' हा रिअॅलिटी कार्यक्रम एमएक्स प्लेअर आणि अल्ट बालाजीवरून प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात १६ कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. त्यांना जेलमध्ये रहावे लागणार आहे. त्याकाळात त्यांना कोणत्याही सोयीसुविधा देण्यात येणार नाहीत. इतकेच नाही तर त्यांना ज्या व्यक्तीचा तिरस्कार वाटतो, त्याच व्यक्तीबरोबर एका लॉकअपमध्ये रहावे लागणार आहे. कंगनाच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचे तर लवकरच तिचे तेजस आणि धाकड हे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. त्याचप्रमामे तिची निर्मिती असलेला टीकू वेड्स शेरू हा सिनेमा देखील प्रदर्शित होईल. याशिवाय कंगनाकडे इमर्जन्सी, सीता यांसारखे महत्त्वाचे प्रोजेक्टसही आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/zfN8gWH