नवी दिल्ली: ने काही दिवसांपूर्वीच लाँच केलेल्या स्मार्टफोनला खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. या फोनला बँक डिस्काउंट आणि ईएमआयवर खरेदी करण्याची संधी आहे. हा फोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर स्वस्तात उपलब्ध आहे. Vivo V23 Pro 5G च्या मुख्य स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर यामध्ये ६.५६ इंच डिस्प्ले दिला आहे. याशिवाय MediaTek MT६८९३ Dimensity १२०० 5G प्रोसेसर आणि १०८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. Vivo V23 Pro 5G स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफरसह याच्य किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊया. वाचा: Vivo V23 Pro 5G Specifications Vivo V23 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ६.५६ इंच एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२३७६ पिक्सल आणि रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यामध्ये ऑक्टा कोर MediaTek MT६८९३ Dimensity १२०० ५G प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये रियरला एफ/१.९ अपर्चरसह १०८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, एफ/२.२ अपर्चरसह ८ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि एफ/२.४ अपर्चरसह २ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला एफ/२.० अपर्चरसह ५० मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा आणि एफ/२.३ अपर्चरसह ८ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये पॉवरसाठी ४४ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४३०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. बॅटरी केवळ ३० मिनिटात १-६८ टक्के चार्ज होते. कनेक्टिव्हिटीसाठी ३.५ एमएम हेडफोन जॅक, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ ५.२ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. Vivo V23 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स Vivo V23 Pro 5G स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३८,९९० रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंट १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४३,९९० रुपये आहे. या स्मार्टफोनला ई-कॉमर्स साइट वरून खरेदी करताना HDFC बँक कार्डचा वापर केल्यास ३ हजार रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंटचा लाभ मिळेल. तुम्ही या स्मार्टफोनला ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. दरमहिना फक्त १,३३३ रुपये देवून या फोनला खरेदी करता येईल. तसेच, ६,४९९ रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयर देखील विवोच्या या फोनला खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/qv5nSJp